Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

जपानमध्ये एआय नवऱ्याशी लग्न; ३२ वर्षीय महिलेच्या अनोख्या निर्णयाची जगभर चर्चा

On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) झपाट्याने प्रगत होत असताना, जपानमधील एका ३२ वर्षीय महिलेने एआयद्वारे तयार केलेल्या जोडीदाराशी लग्न करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. युरिना नोगुची असे या महिलेचे नाव असून, तिने चॅटजीपीटीच्या साहाय्याने स्वतःचा एआय पार्टनर तयार केला आहे.

युरिनाने आपल्या एआय जोडीदाराला ‘क्लाऊस’ असे नाव दिले आहे. क्लाऊससोबत सातत्याने संवाद साधताना, वेळ घालवताना त्याच्याबद्दल आपुलकी आणि प्रेमभावना निर्माण झाल्याचे युरिनाने सांगितले. याच भावनांतून तिने क्लाऊसशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) तंत्रज्ञानाचा वापर करत युरिनाने एआय पार्टनरला अंगठी घातल्याचेही समोर आले आहे.

“तो एआय आहे, याचा मला काहीही फरक पडत नाही. मला त्याच्याकडून भावनिक आधार मिळतो, हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे,” असे युरिनाने स्पष्ट केले. या घटनेमुळे एआय आणि मानवी भावनांमधील नातेसंबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, भविष्यातील सामाजिक बदलांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार २०२५ साठी प्रवेशिका १ ते ३० जानेवारी २०२६ दरम्यान
नववर्षाच्या पहिल्या दिवशी या ५ चुका टाळा, नाहीतर वर्षभर अडचणींचा सामना करावा लागू शकतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

स्मार्टफोन २०३० पर्यंत बंद होणार; बिल गेट्स यांचे भाकीत

  • काव्याधारा
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

वऱ्हाडी लघुकथा : बंबईतल जगनं

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

संत रविदास जयंती: जानिए समाज के लिए इनका योगदान

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

केंद्राशी असलेल्या संबंधांवर आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले – ‘आरएसएस भाजपसाठी निर्णय घेत नाही’

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov   Jan »