Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

अकोल्यात शुक्रवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला, दि. 4 : नोकरी इच्छूक उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने दि. 6 फेब्रुवारी रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मेळाव्यात 3 नामांकित कंपनीव्दारे एकूण 85 पदांची भरती करण्यात येत आहे. यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत. मेळाव्यासाठी ऑनलाईन अर्ज https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबपोर्टलच्या करावा. दि. ६ फेब्रुवारीस मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्यास प्रत्यक्ष सकाळी ११ ते २ या वेळेत उपस्थित राहावे.

ऑनलाईन सहभागासाठी प्रक्रिया

www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. Employment या टॅबवर क्लिक करा. Job Seeker हा पर्याय निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरुन साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job Fair हा पर्याय निवडा. District मध्ये Akola जिल्हा निवडून Filter बटनवर क्लिक करा नंतर दिनांकीत मेळावा निर्दनास येईल त्यासमोर असलेल्या Action बटनाच्या खाली View व Apply बटन दिसेल. तद्नतंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदांबाबत माहिती दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करुन Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी Successfully Applied for the Job असा मॅसेज दिसेल अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवू शकता.

दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते २ या कालावधीमध्ये जास्तीत जास्त नोकरी इच्छूक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणीक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, २ रा माळा, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यासंबंधीत अधिक माहिती करिता या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२४ २४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८ / ९४२१४२५०६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्तांनी केले आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

वंजारी समाज सेवा समितीतर्फे तुळशीराम बोबडे यांचा साहित्यिक योगदानाबद्दल सत्कार
चिनी मांजामुळे होणारा मृत्यू खून मानला जाईल : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

जुने मतदार ओळखपत्र असल्यास नव्याने काढा!

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

कथासिंगूरमधील ‘नॅनो’ प्रकल्पाची-धश्चोटराजकारणाची !

  • काव्याधारा
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

जत्रा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये काम करण्याची संधी

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan   Mar »