Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

AIच्या गैरवापराबद्दल काळजी करावी लागेल – जेफ्री हिंटन

On 2 years Ago
VARHADVRUTT WEB TEAM

AIच्या गैरवापराबद्दल व्यक्त केली  चिंता

वऱ्हाडवृत्त डिजिटल : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (AI) गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे संशोधक जेफ्री हिंटन यांना जॉफ हॉफफिल्ड यांच्या समवेत फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रॉयल स्वीडिश अॅकडमी ऑफ फिजिक्सच्या सदस्यांशी त्यांनी कॉन्फरन्स कॉलवर संवाद साधला. यात हिंटन यांनी AIच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हिंटन कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधक आहेत. AIची संरचना ही मानवी मेंदूच्या रचनेची कॉपी केलेली आहे. याला आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क असे म्हटले जाते. यावर हिंटन यांनी मूलभूत संशोधन केलेले आहे.

ते म्हणाले, “मानवी उत्क्रांतीत जे महत्त्व औद्योगिक क्रांतीचे आहे, तसाच प्रभाव AIचा असेल. यामुळे मानवाच्या बौद्धिक क्षमतांचा विकास होईल. माणसाला त्याच्यापेक्षा बुद्धिमान असलेल्या गोष्टींसोबत काम करण्याचा अनुभव नाही. यामुळे आपली उत्पादकता वाढेल. पण आपल्याला याच्या गैरवापराबद्दलही काळजी करावी लागेल, गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेरही जाऊ शकतात.”

आरोग्यसेवा, संशोधन आणि हवामान बदलावर मात करण्यात AIची मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

जेफ्री हिंटन कोण आहेत? Who is Geoffrey Hinton ?

हिंटन काँप्युटर सायन्स आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी यात काम करतात. मशिन लर्निंग याचा पुढचा टप्पा म्हणजे AI होय. यामध्ये बॅकप्रोपगेशन या संकल्पनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे संगणकीय प्रणाली मिळणाऱ्या आउटपूटमधून स्वतःच शिकत जाते. या बॅकप्रोपागेशनचा शोध हिंटन यांनी लावला. तसेच न्यूरल नेटवर्कमध्ये मौलिक संशोधन गेले.

हिंटन सुरुवातीला अमेरिकेत संशोधन करत होते. पण AIचा वापर संरक्षण सिद्धतेत केला जाऊ नये, ही त्यांची भूमिका होती. त्यातून त्यांनी अमेरिका सोडत कॅनडात स्थायिक होणे पसंत केले. २०१२ला हिंटन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी Alex Net ही प्रणाली विकसित केली होती. फोटो ओळखू शकणारी ही प्रणाली त्या वेळी उपलब्ध प्रणालींपेक्षा ४० टक्के अधिक अचूक होती.

Alex Net नंतर गुगलने विकत घेतले, त्याच वर्षी हिंटन गुगलमध्ये उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. २०२३मध्ये त्यांनी गुगलमधील नोकरीचा राजीनामा दिला. AIबद्दल खुलेपणाने मतं मांडता यावीत यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. “मी केलेल्या संशोधनाचा पश्चाताप नाही, पण दीर्घकाळाचा विचार केला तर AI अनियंत्रित होईल याची भीती वाटते,” असे ते म्हणाले होते.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

डेस्क जॉब करणाऱ्यांसाठी व्यायाम
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 ची पुनरावृत्ती काय होईल? नॅशनल कॉन्फरन्सच्या विजयानंतरचा सर्वात मोठा प्रश्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • आरोग्य
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

विड्याचे पान खाण्याचे ५ फायदे

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पद्मविभूषण पंडित किशन महाराज यांचे ग्रंथसंग्रह दिले दान

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६ पदाधिकार्‍यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार

  • महाराष्ट्र
  • लोकप्रिय लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

अत्तर ही भारताची जगाला देणगी

October 2024
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Sep   Nov »