Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

New Era High School | गुरु-शिष्य नात्याचा साक्षीदार ठरलेला न्यू ईरा हायस्कूलचा स्नेहमिलन सोहळा

On 5 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला : प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला संचालित न्यू ईरा हायस्कूल, दामले चौक, रामदासपेठ येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य व ऐतिहासिक स्नेहमिलन सोहळा दिनांक २७ डिसेंबर रोजी अत्यंत उत्साही, भावनिक व स्मरणीय वातावरणात पार पडला. अनेक दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटविला.#New Era High School Alumni Reunion Ceremony

१९४२ साली स्थापन झालेल्या या शाळेतील १९६० ते २०१५ या कालावधीतील सुमारे १२०० माजी व विद्यमान विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकाच छताखाली एकत्र आले. देश-विदेशातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे या स्नेहमिलनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विश्वनाथ (मोहन) गद्रे, अध्यक्ष – प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला होते. उद्घाटक म्हणून चारू माहुरकर, तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर सुहास मधुकर कुळकर्णी (निवृत्त) उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक महेश मो. ठोके, जयंत मधुकर मराठे, माजी विद्यार्थी मेळावा समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष, प्रा. शि. प्र. मंडळ  तसेच मंडळाचे मान्यवर पदाधिकारी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर प्रतिज्ञा, राष्ट्रगीत, संविधानाची उद्देशिका व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. ही सर्व गीते माजी विद्यार्थिनी जयस्वाल भगिनींनी सादर केली. त्यांच्या सुस्वर व भावपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला प्रेरणादायी सुरुवात झाली. यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.

प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले. यावेळी सागर लोडम संपादित ‘ईर्षा’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रमुख अतिथी ब्रिगेडियर सुहास मधुकर कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतात “भारताचा प्रत्येक नागरिक हा देशासाठी सैनिकासारखा सदैव सज्ज असावा,” असा प्रेरणादायी संदेश दिला. अध्यक्षीय भाषणात प्रा. विश्वनाथ (मोहन) गद्रे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन इमारतीच्या बांधकामास लवकरच सुरुवात होणार असल्याची घोषणा केली. तसेच माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी सातत्याने संपर्क ठेवून शाळेच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्याध्यापक महेश मो. ठोके यांनी न्यू ईरा हायस्कूल शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मराठे यांनी मनोगतातून माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याचे भावनिक महत्त्व अधोरेखित केले आहे. गुरुजन, शाळा आणि मैत्री यांप्रती असलेला जिव्हाळा, सर्व बॅचेसच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यामागील सामूहिक प्रयत्न आणि संस्थेच्या सहकार्यामुळे साकारलेला हा स्नेहमिलन सोहळा. यातून कृतज्ञता, आनंद आणि शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन व्यक्त केले आहे.

या स्नेहमिलन सोहळ्यात माजी शिक्षकांचा ढोल-ताशा व सुतारी वाद्यांच्या गजरात सन्मान करण्यात आला. मिरवणुकीतून शिक्षकांना व्यासपीठावर आणताना वातावरण अत्यंत भावूक झाले. शिक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेची भावना स्पष्टपणे दिसून आली.

कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व औपचारिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. गुणवंत तसेच विविध क्षेत्रांत विशेष पुरस्कार प्राप्त केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या स्नेहमिलनामुळे जुने स्नेहबंध अधिक दृढ झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.

लवकरच इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणाऱ्या या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सचिन देशमुख यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष गोरे सर, राजेश जोशी, राजेश जोध, विनित आसोलकर यांचे मोलाचे योगदान लाभले. भोजन व्यवस्थेसाठी संदीप बाहेती, राजेश चौबे, सुनील नंद, योगेश आगरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. मंडप व्यवस्थेसाठी प्रशांत चिंचोलकर, सुनील चव्हाण, रवी कुलट सर व दिनेश जोशी, तर मंच संचालन व व्यासपीठ व्यवस्थेसाठी राजू बुडखले, मनोज मेंढे व सिद्धार्थ मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली. स्मरणिका व प्रसिद्धी प्रमुख म्हणून सागर लोडम, तर नोंदणी प्रक्रियेसाठी राजेश बडोदेकर व संदीप ठाकुर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन महेश मोडक यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्रे वाचणे अनिवार्य
शिक्षक भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राबवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 months Ago

वाचनाच्या सवयीतून विचारी मन घडते

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार

  • आरोग्य
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

Screen and eye strain | स्क्रीन आणि डोळ्यांवरील ताण

  • काव्याधारा
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

‘योगा शेतकऱ्यांचा’

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov   Jan »