Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • विशेष लेख

वाचनाच्या सवयीतून विचारी मन घडते

On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

मुले ही ओल्या मातीसारखी असतात. त्यांना आकार द्यावा तशी ती घडत जातात. मुलांची चांगल्या प्रकारे जडणघडण करणे आणि देशाचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये सोपवणे ही प्रत्येक गलकाची जबाबदारी आहे. त्यासाठीच मुलांना वाढवताना त्यांना वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे. त्यासाठीचे काही उपाय:

 पहिल्या दिवसापासून वाचन करा:

जेव्हा नवजात मूल आईबरोबर रुग्णालयातून घरी येते त्या दिवसापासून आईने मुलाला घेऊन वाचन सुरु केले पाहिजे. वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके, कथा-कादंबऱ्या, ऐतिहासिक पुस्तके, चरित्रे अशी पुस्तके बाळाला ऐकू येईल अशा आवाजात आणि तालात वाचली तर बाळही त्याला प्रतिसाद देऊ लागते. आई जर रोज बाळाला मांडीवर घेऊन वाचू लागली तर बाळही वाचन संस्कार स्वीकारत मोठे होईल.

तुम्ही वाचत असल्याचे दिसू द्या: तुम्ही पुस्तके, मासिके किंवा ब्लॉग वाचत असलात तरी तुम्ही नियमितपणे वाचन करता हे मुलांना दिसले पाहिजे. मुले निरीक्षणातून शकत असतात आणि आईवडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही नियमितपणे वाचन करता, त्यावर मुलेही वाचनाचा उत्साह स्वतःमध्ये आणतील.

वाचनाची जागा तयार करा: वाचनाची जागा र मोठी असावी किंवा तिथे पुस्तकांची कपाटे असावीत अशी अजिबात कल्पना नाही. अगदी सोफ्याचा कोपरा किंवा मुलांच्या खोलीतील खुर्ची देखील वाचनाची जागा असू शकते. पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा असली की कुठल्याही जागी वाचन करता येते. त्याठिकाणी एक-दोन पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्रे ठेवायला सुरवात करा. तुम्ही तिथे वाचायला बसता असे लक्षात आले की, मुलेही तिथे बसून वाचू लागतील

In बातमी महाराष्ट्र विशेष लेख

Post navigation

कुत्रा चावला तर भरपाई द्यावी लागेल – सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा
तरूणांच्या देशात कोट्यवधी तरूण निष्क्रिय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • आरोग्य
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

जर तुम्ही चवीसाठी जास्त साखरेचे सेवन करत असाल तर …

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

यवतमाळला ३ हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचा शोध

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

मराठीच्या दुरवस्थेला सरकार जबाबदार

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 4 years Ago

जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या काव्य स्पर्धेसाठी कविता पाठवण्याचे आवाहन

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec   Feb »