Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

रथसप्तमी पूजेचे आरोग्य व यशावर होणारे लाभ

On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते. 19 जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात होत आहे. सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात रथ सप्तमी येते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. यावेळी रथसप्तमी 25 जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते. रथसप्तमीचा दिवस हा मकरसंक्रांतीचा शेवटचा दिवस असतो. रथसप्तमी कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घ्या

कधी आहे रथसप्तमी

रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला प्रार्थना करण्याची प्रथा आहे. यावर्षी रथ सप्तमीला सकाळी 7.13 वाजता सूर्योदय होईल. रथ सप्तमीला पवित्र नदीत स्नान करणे देखील एक सामान्य प्रथा आहे. यावेळी रक्षसप्तमी रविवार, 25 जानेवारी रोजी असून सप्तमीची सुरुवात 25 जानेवारीला रात्री 12.39 वाजता होऊन त्याची समाप्ती रात्री 11.10 वाजता होईल. यावर्षी रथ सप्तमीला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 5.26 वाजता सुरू होईल आणि सकाळी 7.13 पर्यंत राहील.

रथसप्तमीची पूजा कशी करायची

रथ सप्तमीच्या सकाळी शुभ मुहूर्तावर स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, रोळी, तांदूळ, लाल फुले आणि पाणी घ्या. नंतर सूर्यदेवाचे मंत्र जप करताना त्यांना पाणी अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. सूर्य चालीसा पठण करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर, गरिबांना दान करा.

रथसप्तमीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

रथसप्तमीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सूर्यदेवाची पूजा. हिंदू धर्मात सूर्य देवाला जीवनाचा स्त्रोत मानले जाते. सूर्याच्या प्रकाशामुळेच जीवन, कृषी आणि आरोग्य टिकते अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीवर सूर्य देवाचे पूजन केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात, असे म्हटले जाते.  शरीराला नवीन ऊर्जा लाभते, आरोग्याचा समतोल राहतो,  मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते,  जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते, हे सर्व कारणे रथसप्तमीला अत्यंत शुभ मानले जाते

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण: भारतात कोणते ग्रहण दिसेल ते जाणून घ्या | Grahan 2026
योनी मुद्रा : थायरॉईड व पीसीओडीवर लाभदायक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 9 months Ago

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

  • आरोग्य
  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

१०० औषधे स्वस्त होणार

  • बातमी
VARHADVRUTT WEB TEAM
On 12 months Ago

Bacchu Kadu | बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; सरकारने दिलेले वचन पूर्ण न केल्यास 2 तारखेला मंत्रालयात घुसणार?

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पॅरासिटामॉल, शुगर आणि ब्लड प्रेशर व्यतिरिक्त 53 औषधे चाचणीत अयशस्वी, यादी जाहीर

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec   Feb »