Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

डॉ. रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सर्जनशील उत्सव; अर्चित चांडक यांचे प्रतिपादन – आजचे विद्यार्थीच उद्याचा विकसित भारत घडवणार

On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

अकोला | प्रतिनिधी
आजचे विद्यार्थी हेच भविष्यातील प्रगत व विकसित भारताचे खरे निर्माते असतील, असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. अर्चितजी चांडक यांनी केले. ते माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रंगभरण व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील हे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार वसंतराव खोटरे, डॉ. अपर्णाताई पाटील, मा. संजय चौधरी, राज पवित्रकार, प्रकाश चतरकर, आशिष चौथे, सचिन काठोळे, रविकुमार खेतकर, विजय वाकोडे, दिलीप भाकरे, प्रमोद गिते, साबीर कमाल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. रणजीत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य आणि राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) व विदर्भ कला शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २५ जानेवारी रोजी नेहरू पार्क, अकोला येथे या रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अकोला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव, मतदानाचे महत्त्व आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणे व कलात्मक अभिव्यक्तीला वाव देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

ही स्पर्धा एकूण तीन गटांत घेण्यात आली.

  • गट अ: इयत्ता २ री ते ४ थी – रंगभरण स्पर्धा
  • गट ब: इयत्ता ५ वी ते ७ वी – रंगभरण स्पर्धा
  • गट क: इयत्ता ८ वी ते १० वी – चित्रकला स्पर्धा

स्पर्धा मतदार जागृती, प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव आणि भविष्यातील भारत या विषयांवर निःशुल्क घेण्यात आली.

तीनही गटांतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी शैक्षणिक टॅब, द्वितीय क्रमांकासाठी सायकल, तर तृतीय क्रमांकासाठी स्मार्ट वॉच देण्यात आली. याशिवाय प्रत्येक गटात पाच उत्तेजनार्थ विजेत्यांना स्कूल बॅग देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रणजीत पाटील मित्र मंडळ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) अकोला व विदर्भ कला शिक्षक संघाचे संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन, दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर,  संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, चंद्रशेखर पेठे, गजानन शेवलकर, सुनिल माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, संतोषराव इंगळे, नितीन बंडावार, राजेश मसने, गजानन गोतरकर, ग.सु.ठाकरे, समाधान उमप, विजय धनाडे,  सुरेश परमाळे, एहसान पठाण, श्याम कुलट, दिनेश भटकर, संतोष रा. इंगळे, रूपेश सुर्यवंशी, अश्विन हिंगणकर, अनिल भाकरे, सुभाष जोगदंड, प्रशांत पुराणीक, रविंद्र आवारे, रविंद्र जाधव, बिपिन कुरई,अंजली मानकर, सुनिता कोथळकर, सुरेखा जोशी , सरिता सोळंके , कुमुद अंबाळकर, निलिमा दांदळे, संजीवनी चतरकर, सुनिता काठोळे, वंदना वाकचवरे, शितल महाजन, लिना भाकरे, प्रिती वाघमारे, स्वप्नाली कुलट, स्वप्नाली सुरपाटणे, रघुनाथ चव्हाण ,मनोज राठोड, अनंत मिसाळ, दिगंबर खडसे , सतिष खंडारे, मंगेश पेशकर, संदिप मानकर, विनोद शिवरकर, प्रशांत देशमुख, गणेश ठाकरे, अतुल गावंडे, हर्षल दोड, राहूल अडगावकर, निलिमा दांदळे, शिवशंकर अस्वार ,अमोल सराफ, विष्णू झामरे, अमोल कावरे, अमित सुरपाटने , अरूण भराडी , निलेश शेगोकार, महेंद्रकुमार चव्हाण, मोहसीन खान, निलेश धांडे , संदिप महल्ले, राजेश ढोरे, प्रकाश साबळे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी!
२०२६ टी-२० विश्वचषकाचे वार्तांकन नाही; बांगलादेशी पत्रकारांवर आयसीसीची बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

Varhadvrutt Diwali | वऱ्हाडवृत्त दिवाळी अंकाचे प्रकाशन

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

Malaria relief | “जागतिक हिवताप दिन”

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 2 years Ago

पेजर फुटू शकतात तर ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाही? निवडणूक आयोगाने उत्तर दिले

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec   Feb »