Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • बातमी
  • महाराष्ट्र

शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे कोच कॅन्टीनचं भव्य उद्घाटन

On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर आज प्रवाशांसाठी एक वेगळं आणि आकर्षक उपक्रम सुरू झाला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते रेल्वे कोच कॅन्टीनचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. या अनोख्या कॅन्टीनमुळे शेगाव रेल्वे स्थानकाच्या सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली आहे.

विशेष म्हणजे, या उपाहारगृहाची रचना रेल्वे कोचच्या स्वरूपात करण्यात आली असून त्याच्या अंतर्गत सजावटीत महाराष्ट्र आणि भारताच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवण्यात आलं आहे. संत गजानन महाराजांचं समाधीस्थळ, पंढरपूरचे आराध्य दैवत विठुराया, तसेच आधुनिक भारताचं प्रतीक ठरलेली वंदे भारत रेल्वे यांची सुंदर चित्रं कॅन्टीनच्या भिंतींवर रंगवण्यात आली आहेत. त्यामुळे हे कॅन्टीन केवळ भोजनासाठीच नव्हे, तर पाहण्यासारखं आकर्षण ठरत आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक शेगावला भेट देतात. अशा वेळी प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, या उद्देशानं हे रेल्वे कोच कॅन्टीन सुरू करण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे हे उपाहारगृह २४ तास सुरू राहणार असून त्यामुळे दिवस-रात्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उद्घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे प्रशासनाच्या या उपक्रमाचं कौतुक करताना सांगितलं की, प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढवण्यावर केंद्र सरकारचा भर असून अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे स्थानकांची ओळख अधिक चांगल्या प्रकारे निर्माण होते. स्थानिक नागरिक, रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांचीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या रेल्वे कोच कॅन्टीनमुळे शेगाव रेल्वे स्थानकाचं सौंदर्य आणि प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

In बातमी महाराष्ट्र

Post navigation

2030 चे स्वप्न आणि आजची वास्तवस्थिती
महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झालीत… १४ जूनपर्यंत फ्रीमध्ये करा आधार अपडेट, नंतर मोजावे लागणार पैसे

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

स्थूलतेची व्याधी

  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 1 year Ago

Municipal elections | महापालिका निवडणुका कधी होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हे तर एआयसुद्धा…’

  • आरोग्य
  • बातमी
  • महाराष्ट्र
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 years Ago

माठातील पाणी आरोग्याला लाभदायक

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec   Feb »