Skip to content
Varhadvrutt News

Varhadvrutt News

Varhadvrutt News

  • महाराष्ट्र
  • बातमी
  • अध्यात्म
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • काव्याधारा
  • संपादकीय
  • इ-पेपर
  • आमच्याविषयी
  • संपादकीय

2030 चे स्वप्न आणि आजची वास्तवस्थिती

On 4 months Ago
VARHADVRUTT WEB TEAM

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात असं म्हटलं आहे की २०३० पर्यंत भारताचं दरडोई उत्पन्न ४ हजार डॉलर्सच्या पुढे जाईल. हे ऐकायला छान वाटतं. पण आज देशातली परिस्थिती पाहिली, तर हा दावा किती खरा आहे, असा प्रश्न पडतो.

आज भारतात बेरोजगारी मोठी समस्या आहे. अनेक तरुण शिक्षण घेत असूनही त्यांना नोकÚया मिळत नाहीत. गावाकडे शेतीवर अवलंबून असलेले लोक पुरेसं उत्पन्न मिळवू शकत नाहीत. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. काही वेळा या तणावामुळे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. हे चित्र खूप वेदनादायक आहे.

दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील सगळ्यांचं सरासरी उत्पन्न. पण प्रत्यक्षात श्रीमंत लोक खूप श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक तिथेच अडकलेले आहेत. त्यामुळे ही सरासरी आकडेवारी खरी परिस्थिती दाखवत नाही. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली म्हणून संपूर्ण देश श्रीमंत झाला असं म्हणणं चुकीचं आहे.

ग्रामीण भागात अजूनही पाणी, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मूलभूत सोयींची कमतरता आहे. शेतक-यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. तरुणांना स्थिर नोक-या नाहीत. अशा परिस्थितीत ४ हजार डॉलर्स म्हणजे साधारण ३ ते ४ लाख रुपये. पण आज अनेक लोकांना महिन्याला १०-१५ हजारही मिळत नाहीत. त्यामुळे हे स्वप्न फार दूरचं वाटतं. विकास म्हणजे फक्त मोठे आकडे नाहीत. लोकांच्या जीवनात खरा बदल झाला पाहिजे. प्रत्येकाला काम मिळालं, शेतकÚयांना आधार मिळाला आणि गरिबांचं जीवन सुधारलं, तरच खरा विकास होईल.  म्हणूनच सरकारने केवळ अहवालांवर न थांबता, सामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यावर लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर २०३० चं स्वप्न फक्त कागदावरच राहील.

In संपादकीय

Post navigation

पचन व सांधेस्वास्थ्यासाठी दैनंदिन योगासन
शेगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे कोच कॅन्टीनचं भव्य उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या घडामोडी

  • संकटकाळात सोन्यानेच वाचवला भारताचा मान; पुन्हा ‘गोल्ड कंट्रोल’ची चर्चा
  • Railways | रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल! AI सांगणार तिकीट कन्फर्म होईल का
  • ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?
  • वाढता स्क्रीन टाइम: मुलांच्या मानसिक आरोग्यासमोरील गंभीर धोका
  • आपल्याकडील उपलब्ध हस्तलिखिते ‘ज्ञानभारतम्’या मोबाईल ॲप वर अपलोड करा – मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

Categories

  • अध्यात्म
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • इ-पेपर
  • काव्याधारा
  • क्रीडा
  • बातमी
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • लोकप्रिय लेख
  • विशेष लेख
  • संपादकीय

ह्या सुद्धा बातमी वाचा

  • संपादकीय
VARHADVRUTT WEB TEAM
On 5 months Ago

कर्करोगाला देशभरात अधिसूचित आजार करण्याची गरज

  • बातमी
  • महाराष्ट्र
  • संपादकीय
VARHADVRUTT WEB TEAM
On 3 weeks Ago

ई-फार्मसीविरोधातील बंद : रुग्णहित की व्यवसायहित?

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec   Feb »