नागपूर : राज्यातील नागरी भागातील लहान भूखंडांवरील तुकडेबंदी शिथिल करणारे ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, 2025’ आज विधानसभेत मंजूर झाले. या निर्णयामुळे ६० लाख कुटुंबांच्या सातबाऱ्यावर स्वतंत्र नाव लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून लहान भूखंडांची खरेदी-विक्री आता सुलभ होणार आहे.
नवीन तरतुदींनुसार नियोजन प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यास वेगळी NA परवानगी गरजेची राहणार नाही, तर ‘एक वेळचे अधिमूल्य’ भरून प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
विधेयकाला विरोधकांच्या काही सूचना असल्या तरी सर्वपक्षीय पातळीवर व्यापक पाठिंबा मिळाला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की हा कायदा बिल्डर्ससाठी नव्हे तर लहान तुकड्यांवर राहणाऱ्या ६० लाख कुटुंबांच्या कायदेशीर हक्कांसाठी आहे.
