नागपूर, दि. ९ : रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी परिवहन विभागाच्या ‘झेब्रु’ शुभंकराचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या शुभंकरामुळे रस्ता सुरक्षा मोहीम अधिक प्रभावी ठरेल आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी ‘रस्ता सुरक्षा जीवन रक्षा’ हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले. परिवहन मंत्री सरनाईक यांनी झेब्रु रस्ता सुरक्षेचा संदेशवाहक ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात झेब्रु शुभंकराचे अनावरण आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
