वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
शिर्ला (अंधारे) : वकील ठेवायची ऐपत नसेल तर विधी समितीकडे अर्ज करा असे उद्गार पातुर न्यायालयाचे न्यायमूर्ती के.के .कुरंदळे यांनी अकोला जिल्हा सेवा प्राधिकरण ग्रामपंचायत शिर्ला आणि सोमपुरी महाराज यांनी संयुक्तरित्या दि 4 /11 /2022 ला आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात काढले. पुढे बोलताना ते म्हणाले की प्रकरण निकषात बसणारे पाहिजे. सदर कार्यक्रमात दिवाणी न्यायाधीश पी एस ठाकरे, अँड काळपांडे, अँड सय्यद मोहसिन यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत सरपंच अर्चनाताई शिंदे ,उपसरपंच कल्पनाताई खर्डे ,मीराताई राऊत, उमा अंधारे ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, अध्यक्ष नारायण अंधारे वीर पिता काशीराम निमकंडे यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे, गुलाबराव कोकाटे, नीलकंठ राव अंधारे, सुधाकर शिंदे, सुरेश वसतकार उकर्डा ढाळे, दादाराव अंधारे, जनार्दन इंगळे, हरिभाऊ कठाळे, देविदास निमकंडे, रामदास सावरकर, मधुकर रौंदळे, बाबाराव गवई, ताईबाई वसतकार, दुर्गाबाई बगाडे, अँड भाग्यश्री गवई, मैना उपर्वट, ज्योती इंगळे, लता सावंत, पुष्पा निमकंडे, रेखा सोळंकी, अनंता अंधारे, श्रीकृष्ण रा. अंधारे, गजानन अंधारे, हेमंत घुगे, संजय ढाळे आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.