लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची शासनाकडे मागणी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला….कोरोना काळातील आर्थिक नुकसानाने बिकट परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांची शासनाने गंभीरतेने दखल घ्यावी. समस्याग्रस्त पत्रकारांना प्राधान्याने न्याय देण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोला येथून स्थापित समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने शासनाकडे केली आहे.पत्रकार महासंघाचा मासिक विचारमंथन,वार्षिक सर्वसाधारण सभा तथा स्नेहमिलन आणि सत्कार समारंभ स्थानिक जठार पेठेतील जैन रेस्ट्रो येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रथम सत्रातील वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ज्येष्ठ पत्रकार,दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचे अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहमिलन तथा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रकाशमान पोहरे यांची इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्व भाषिक वृत्तपत्र संपादक- प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेच्या उपाध्यक्षपदी तिसऱ्यावेळी निवड झाल्याबद्दल त्यांचा व याच राष्ट्रीय कार्यकारिणीतील निवडीबध्दल लोकस्वातंत्र्यचे संस्थापक – राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
सहकार विभागाचे अकोला जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर,निर्माण ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष गणेशराव देशमुख व लोकस्वातंत्र्यचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांनाही सन्मापत्रे आणि शाल प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रथम सत्रात संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांचे अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसारण सभा झाली.यामध्ये कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर,उपाध्यक्ष प्रदिपजी खाडे,किशोर मानकर,सचिव राजेन्द्र देशमुख,मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.डॉ.संतोषजी हूशे,शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे,अॕड.राजेश जाधव,अंबादास तल्हार,संदिप देशमुख हे केन्द्रीय पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विषय वाचन सचिव राजेन्द्र देशमुख यांनी तर अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी सभेच्या कामकाजाची माहिती दिली.हिशोबी कागदपत्रांचे वाचन करून झालेल्या खर्चाला मंजुरात देण्यात आली.
राज्यातील पत्रकारांच्या विविध कल्याण योजना शासनाकडे अनेक कारणांनी दिर्घकाळ प्रलंबित राहतात,त्यामुळे त्यावर शिघ्रगतीने निर्णय व्हावेत यासाठी शासनाने पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी.पत्रकार हा सामाजिक विकास आणि शासनाच्या योजना विकासाभिमुख करणारा सेवादुत असतांना त्यांच्या अडचणी सोडविण्यास मात्र शासन शिघ्रगतीने प्रयत्न करीत नाही.राष्ट्राच्या या आधास्तंभांना नवे बळ देण्यासाठी जाहिरात वितरण व्यवस्थेत बदल झाले पाहिजेत,”क” गटातील वृत्तपत्रांना जाहिरातींचे वितरण दुप्पट प्रमाणात वाढवावे,,”अ,ब आणि क ” गटातील वृत्तपत्रांच्या व्दिवार्षिक पडतळणीमधील अव्यवहार्य जाचक अटी शिथील कराव्यात,त्याचप्रमाणे जिल्हा परिषद,पंचायत समिती निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जाहिरातींचे रोस्टर पूर्णपणे कोलमडलेले असून त्यामुळे काही मोजके वगळता सर्वसामान्य पत्रकारांवर अन्याय होत आहेत.त्यामुळे याबाबत कडक आदेश देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिरातींवर नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.असे विविध ठराव या सभेत पारित करण्यात आले.त्याचप्रमाणे पत्रकार हल्ले प्रकरणातही तक्रारी नोंदवून गुन्हेगारांवर अविलंब कारवाया करण्याच्या सुचना पोलिस प्रशासनाला देण्यात याव्यात.पोलिस प्रशासन पत्रकारांना योग्य वेळेत उचित सहकार्य करीत नसल्याची वास्तवता अध्यक्ष संजय देशमुख यांनी उदाहरणांसह अधोरेखित केली.त्याचप्रमाणे राज्यातील पत्रकारांकडून घेतला जाणारा टोल टॅक्स तथा रेल्वे प्रवासाच्या सवलतीचा केंन्द्रशासनाकडील मुद्दा सुध्दा ईलनाच्या दिल्ली येथे दि.८ आक्टो.रोजी होणाऱ्या सभेत उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यशासनाकडील या सर्व मुद्द्यांच्या बाबतित मुख्यमंत्री,महासंचालक व संबंधितांशी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून पत्रकारांना न्याय देणाऱ्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.याप्रसंगी विदर्भ विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख डॉ.शंकरराव सांगळे,किशोर मुटे,( वर्धा)अॕड.राजेशजी कराळे,दिपक देशपांडे,सौ.कल्याणी मुटे( वर्धा)अकोला जिल्हाध्यक्ष मोहन शेळके,सागर लोडम,सौ.दिपाली बाहेकर,प्रा.सुरेश कुलकर्णी,श्याम कुलकर्णी,मंगेश चऱ्हाटे,राहूल राऊत,दिलीप नवले,मनोहर मोहोड,मनोज देशमुख,रविन्द्र देशमुख,सुरेश भारती,अरूण भटकर,व्यंगचित्रकार शुभम् बांगडे (चांदुर बाजार) व बहूसंख्य पत्रकार सभासद उपस्थित होते.संचलन मनोज देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन सचिव राजेन्द्र देशमुख यांनी केले.