वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकच्या युजर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यात फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. एखादा झक्कास फोटो किंवा व्हिडिओ फेसबुकवर टाकला की जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळावेत याकडं तरुणाईचा अधिक भर असतो. मग त्यासाठी वाटेल ते करायला देखील नेटकरी तयार होतात. पण आता पोस्टच्या खाली दाखवणाऱ्या लाईक्सची संख्या किती हे कळणार नाही. फेसबुकने ही माहिती दिली आहे की आता इतर लोकं आपले लाइक्स बघू शकणार नाही आणि ढरस “fसिसशीींळेपी फीचर देखील बदलण्यात आले आहे.
फेसबुकप्रमाणे या प्रकाराचे बदल फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्सवर मिळणार्याई Likes ची संख्येत रुची संपवेल आणि लोकं पोस्टावर अधिक लक्ष देतील. फेसबुकच्या मालकी हक्क असणार्या ‘इंस्टाग्राम’ ने या वर्षीच्या सुरुवातीला घोषणा केली होती की ते व्हिडिओ पाहणार्यासची संख्या आणि त्याला लाइक करणायाँ ची संख्या किमान ६ देशांपासून लपवण्याचा प्रयोग करत आहे, जिथे खातेदार लाइक्सची संख्या तर बघू शकतात परंतू इतर लोकांना ते दिसणार नाही. सोशल नेटवर्किंग साईटच्या एका प्रवक्त्याने सांगितले की आम्ही Facebook वरील लाइक्स ची संख्या प्रदर्शित न करण्यावर विचार करत आहे. __Tag suggestions फीचर हटणार: फेसबुकने फोटो अपलोड केल्यावर चेहरा ओळखणायी त्या सॉफ्टवेअरला वापरणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे जे यूजर्सला Tag suggestions देतं होतं.
फेसबुकने सांगितले की ते ‘ढरस’ संबंधी सल्ला देण्याऐवजी चेहरा ओळखणारी अशी सेटिंग प्रदान करणार जे केवळ टॅग करण्यासाठी नव्हे तर विविध वापरासाठी फोटोमध्ये लोकांचा चेहरा ओळखेल.
फेसबुक यूजर्सला ‘टॅग सजेशन’ च्या फीचरऐवजी आता ‘फेस रिकग्निशन सेटिंग’ पर्याय मिळेल, ज्याला ‘ऑन किंवा ऑफ’ करता येईल. सध्या जगभरात फेसबुकचे एक अब्जाहून जास्त यूजर्स आहेत. मात्र या व्यासपीठाचा परिणाम यूजर्सच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याने तो टाळण्याचा मोठा दबाव या कंपनीवर होता. ऑस्ट्रेलियामध्ये पाचपैकी एका मुलाला सायबर धमकीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती या देशाच्या ईसेफ्टी आयुक्तांनी दिली आहे. या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियामध्ये लाइक्सची संख्या लपवण्याचा प्रयोग केला जाणार आहे. त्यानुसार, पोस्ट करणारा लाइक्स आणि प्रतिक्रिया पाहू शकेल, मात्र इतरांसाठी ते महाइडफ झालेले असेल. इतरांना म्युच्युअल फ्रेंड्सच्या नावांसह प्रतिक्रियांचे आयकॉन दिसत राहतील. अशा प्रकारे इतर यूजर्स एकमेकांच्या पोस्टवर आलेल्या लाइक्स आणि प्रतिक्रिया पाहू शकणार नाहीत. यामुळे कमी लाइक्स, की जास्त लाइक्सची स्पर्धा कमी करण्यास मदत मिळणार आहे.
फेसबुकला सध्या आपल्या प्लॅटफॉर्मवरील तरुण यूजर्सवर पडणाऱ्या दबावाची काळजी आहे. याच कारणामुळे हा निर्णय घेतल्याचे फेसबुकने म्हटले आहे. यानंतर आपले विचार, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना सर्वांना अधिक सोईचे आणि सहज वाटेल, असे फेसबुकला वाटते. सोशल मीडियावर कमी लाइक्स आल्याचे पाहून सायबर धमक्या आणि आत्महत्येसारखी प्रकरणे पुढे आली आहेत. आता नव्या पद्धतीमुळे आपल्या पोस्टला कुणी लाइक केले हे लाइक्स आयकॉनवर टॅप केल्यानंतर कळणार आहेच, मात्र टाइमलाइन स्क्रोल करताना आकडा दिसणार नाही. हे या प्लॅटफॉर्मवरील सुधारणेचे एक पाऊल आहे, असे फेसबुकला वाटते.
फेसबुकचा मोठा निर्णय
फेसबुकनं अधिकृतरित्या युजर्सच्या पोस्टखाली दाखवल्या जाणाऱ्या लाईक्सची संख्या हाइड करण्यास सुरुवात केली आहे. २७ सप्टेंबरपूर्वी ऑस्ट्रेलिया इथं पहिल्यांदा हा नवीन नियम लागू करण्यात आला. त्यामुळे पोस्ट करणाऱ्या युजर्सला लाईक्स किंवा रिअॅक्शन किती आहेत हे दिसणार आहे. मात्र अन्य जणांना ती गोष्ट दिसणार नसून फक्त म्युच्युल फ्रेन्ड्स यांच्या नावासह रिअॅक्शन आयकॉन्स दाखवण्यात येणार आहे. अशाच प्रकारे अन्य युजर्स एकमेकांच्या पोस्ट आल्यावर मिळणारे लाइक्स काउंट पाहू शकणार नाहीत.
व्हिडिओ व्यूजही हाईड अन्य युजर्सच्या पोस्टला देण्यात येणाऱ्या कमेंट्सची संख्या किंवा पोस्टवर व्हिडिओ व्यूजसुद्धा युजर्स पाहू शकणार नाहीत. मात्र नव्या सिस्टममुळे लाईक्स आयकॉन्सवर टॅप करुन पाह शकता येणार आहे. यामुळे कोणी तुमच्या पोस्टला लाइक केलं आहे हे समजू शकणार आहे. परंतु टाईमलाइन स्क्रोल करताना लाईक्सची संख्या दिसून येणार नाही. हा निर्णय का घेतला? फेसबुकनं याबाबत असं सांगितलं की, फेसबुकवर लाईक्स आणि कमेंट्समुळे होणाऱ्या भांडणामुळे कोणता नवा वाद होऊ नये. तसंच हा एक प्रयोग असून यामुळे नवा फॉर्मेट कशा पद्धतीनं वापरतात हे पाहणार आहोत. सोशल मीडियवर युजर्सला मिळणाऱ्या लाईक्सच्या तणावामुळे सायबर हल्ले किंवा आत्महत्येचे प्रकारही समोर आले. युजर्सच्या मनावर होणारा परिणाम आणि ताण लक्षात घेता लाईक्स, व्यूजची संख्या हाइड करण्याचा निर्णय आम्ही घेतला.