वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
ग्राम शिर्ला(अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाची आमसभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्ये.ना. महासंघाचे (फेस्काॅम)अतिरिक्त मुख्य सचिव अभि. विनायकराव पांडे,विदर्भ पश्चिमचे सचिव डॉ सुहास काटे, प्रा डॉ सुनिता कदम ,प्रादेशिक कृषी समिती अध्यक्ष चोथमल सारडा होते.प्रतिमा पुजन आणि साने गुरुजी प्रार्थनेनंतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांचे स्वागतानंतर अध्यक्ष नारायण अंधारे यांनी अहवाल वाचन केल्यानंतर सचिव श्रीकृष्ण रा अंधारे यांनी आमसभेच्या विषयावर विवेचन केले .विरंगुळा केंद्रास जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन आणि निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. नितीनजी देशमुख (आमदार बाळापुर विधानसभा) यांचे प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आला. निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा व माहे सप्टेंबर मध्ये वाढदिवस असणाऱ्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. नवनियुक्त कार्यकारणीस मान्यता देण्यात आली.आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ सुनिता कदम यांनी जेष्ठांच्या आरोग्यावर आपल्या मनोगतांमध्ये आहार विहार आणि विचार यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले अभि. विनायकराव पांडे यांनी गाव तिथे संघ स्थापन करण्याचे आवाहन केले तर डॉ सुहास काटे यांनी योग क्रियांनी आरोग्याची जपवणूक करण्यासंबंधी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली तर चोथमलजी सारडा यांनी जागतिक जेष्ठ नागरिक दिनाची पार्श्वभूमी विशद केली. शासकीय लेखापरीक्षक दीपक ढवळे यांनी व्यसनमुक्तीची आवश्यकता व्यक्त केली. प्रा यादव वक्ते यांनी सुश्राव्य भजन सादर केले. तर रामदयाल इंगळे यांनी भैरवी सादर केली सभेचे बहारदार सूत्रसंचालन रामायणाचार्य महादेव महाराज निमकंडे यांनी केले. प्रमुख उपस्थितांमध्ये रामदास वांडे, भगवंतराव गावंडे आसलगावकर, रमेश बाहेती ,रामदयाल इंगळे, नंदकिशोर गिरी ,तुकाराम गोमासे, समाधान कुकडे, पांडुरंग वरणकार, दिलीप अंधारे, पत्रकार गहिले , कृष्णराव घाडगे ,वामनराव राठोड, शैलेश राठोड, वीरपीता काशीराम निमकंडे, निळकंठराव अंधारे, गुलाबराव कोकाटे, सुरेश वसतकार, रामदास सावरकर, रमेश वरणकार वीरमाता मंदाबाई निमकंडे चंद्रभागा ढाळे, डिगांबर ढाळे, उमेश कोकाटे, सौ निर्मला राऊत, सौ वर्षा पातुरे, प्रकाश उगले ,गणेशराव अंधारे, युवराज इंगळे ,देविदास अंधारे, मधुकर रौंदळे, श्रीकृष्ण डायकर, मनोहर सावंत ,अनंता अंधारे, प्रणव अंधारे, गजानन अंधारे ,श्रीकृष्ण रामेश्वर अंधारे, प्रवीण अंधारे ,वासुदेव बोचरे, प्रल्हाद पातुरे, ज्ञानेश्वर पातुरे,गणेश निलखन, आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.