अलीकडेच ‘द लॅन्सेट डायबेटीज अॅण्ड एन्डोक्रीनॉलॉजी’ या जगप्रसिद्ध जर्नलमध्ये मधुमेहाची देशातील सद्यस्थिती दर्शवणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के लोकांना मधुमेह हा आजार जडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मद्रास डायबेटीज रिसर्च फाऊंडेशन (एमडीआरएफ) या संस्थेने इंडिय काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेच्या मदतीने याबाबतचा अभ्यास केला आहे.
आयसीएमआरच्या मते, येत्या पाच वर्षांत देशात मधुमेहाचा भार झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. विशेषत: ग्रामीण भागात आणि राज्यांमध्ये जेथे मधुमेहाबाबत जागरूकता सध्या कमी आहे. तेथे ही भीती जास्त आहे. मधुमेह तज्ज्ञ डॉ. मोहन यांनी ३१ राज्यांतील १ लाख १३ हजार लोकांवर केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. त्यानुसार भारतात आजघडीला १०.१ कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०१९ मध्ये हा आकडा ७० दशलक्ष होता. धक्कादायक बाब म्हणजे १३.६ कोटी लोक प्रीडायबीटिक आहेत. डॉ. व्ही. मोहन यांच्या मते, प्री-डायबिटीक असलेल्या प्रत्येकालाच मधुमेह होत नाही. मात्र भारत आणि दक्षिण आशियामध्ये यामुळे मधुमेह होण्याचे प्रमाणही बरेच आहे. मधुर उभ्या असलेल्या साधारण एकतृतीयांश लोकांना मधुमेह होण्याची शक्यता असते. उर्वरित लोकांची योग्य आहार, योग्य जीवनपद्धती, व्यायाम यामुळे यातून सुटका होऊ शकते,
मधुमेहाच्या सर्वच प्रकारांचे प्रमाण भारतात झपाट्याने वाढते आहे. केवळ टाईप रचेच प्रमाण नाही तर टाईप १ मधुमेहाचे प्रमाणही वाढत आहे… स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हा मधुमेहाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास केवळ आहारच कारणीभूत नसून त्यामागे इतरही कारणे आहेत.
रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं म्हणजे मधुमेह होय. ही साखर औषधांनी नियंत्रित केली म्हणजे यावर उपाय केला असा बऱ्याच जणांचा समज असतो. मात्र हा समज पूर्णपणे बरोबर नाही. कारण साखर नियंत्रित झाली तरीही या साखरेमुळे ती रक्तात भिनते. शरीरातील पेशींना ती वापरता येत नसल्यामुळे इतरही काही लक्षणे आढळतात. पण ती बरेचदा दुर्लक्षित राहतात. मधुमेहामुळे किडनी, हृदय, रक्तवाहिन् प्रतिकूल परिणाम होत असतात. जगातील प्रगत देशात प्रौढांमध्ये अंधत्व येण्याचे सर्वात मोठे कारण मधुमेह आहे. मधुमेह जितका अधिक वर्षापासून तितकी डायबेटीक रेटिनोपॅथीची शक्यता अधिक असते. याखेरीज म्हणजेच किडनीवरही मधुमेहाचा प्रतिकूल परिणाम होतो. एका पाहणीनुसार, सुमारे ५० टक्के किडनीविकार हे मधुमेहामुळे होतात. किडनीमध्ये रक्त शुद्ध करण्याच्या कार्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे अडथळे निर्माण होतात. सात ते दहा वर्षानंतर किडनीवर मधुमेहाचे दुष्परिणाम दिसून येतात. मधुमेहाचे टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रकार आहेत. टाइप- १ या प्रकारात शरीरात इन्सुलीन स्रवत नाही किंवा ते अत्यंत कमी प्रमाणात स्रवते. हे रुग्ण इन्सुलीनच्या इंजेक्शनशिवाय जगू शकत नाही. टाइप-२ या प्रकारात इन्सुलीन कमी प्रमाणात स्रवते, पण या रुग्णांमध्ये गोळ्यांमुळे मधुमेह आटोक्यात येऊ शकतो. मधुमेह हा अनुवंशिक रोगही मानला जातो. आई, वडील किंवा कुटुंबातील सदस्यांना मधुमेह असेल तर मुलांना होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा लोकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे.
वास्तविक पाहता मधुमेहावर नियंत्रण मिळवणे हे अवघड नाही. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. ही इच्छाशक्ती व्यायाम, आहार नियंत्रण आणि आरोग्यदायी जीवनशैली यासाठी वापरल्यास मधुमेहापासून मुक्तता होऊ शकते. यामध्ये सर्वांत प्राधान्याने करावयाची गोष्ट म्हणजे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे. दुसरा उपाय म्हणजे चालणे, धावणे, जिने चढउतार करणे यांसारखे व्यायाम १ तास नियमितपणे करणे. याजोडीला प्राणायाम, दीर्घश्वसनाची जोड दिल्यास अधिक उत्तम. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आहार. मधुमेहींनी आहारात प्रोटिन्सचे प्रमाण वाढवणे आणि साखरेला पूर्णविराम देणे गरजेचे आहेच; पण त्याचबरोबर पचनसुलभ आहार निर्धारीत वेळेत घेणे आणि आहारानंतर काही मिनिटे चालणे हा शिरस्ताच बनवायला हवा. साखरेबरोबरच आहारातील मीठाचे प्रमाण किमान पातळीवर आणावे. भरपूर पाणी प्यावे.. तंतुमय पदार्थ, क जीवनसत्वयुक्त पदार्थ, पालेभाज्या यांचे अधिक सेवन करावे. हे सर्व उपाय वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करायला हवेत.
डॉ. महेश बरामदे