नवी दिल्ली। राष्ट्रपती भवन १ डिसेंबर २०२२ पासून आठवड्यातून ५ दिवस जनतेसाठी खुले राहील. राष्ट्रपती भवनला बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार (राजपत्रित सुट्ट्या वगळता) या दिवशी वेळेच्या ५ स्लॉटमध्ये म्हणजे सकाळी १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १, २-३ आणि ३ ते ४ या वेळेत भेट देता येईल. दर शनिवारी, लोकांना राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात सकाळी ८ ते ९ या वेळेत चेंज ऑफ गार्ड सोहळा देखील पाहता येईल. http://rashtrapatisachivalaya. gov.in/rbtour या संकेतस्थळावर अभ्यागत त्यांचे स्लॉट ऑनलाइन आरक्षित करू शकतात.
About The Author
Post Views: 66