वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क

अकोला- वैद्यकीय व मानवीय सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या महाराष्ट्र प्रादेशिक मारवाड़ी सम्मेलनच्या वतीने महानगरात वैद्यकीय उपकरण सेवा बॅंक प्रारंभ करण्यात आली.यात गरजू रूग्णांना ऑर्थोपेडिक वैद्यकीय व उपकरण उपचारासाठी देण्यात येणार आहेत.यात हॉस्पिटल बेड,व्हीलचेयर,सी.पी.एम. मशीन आदींचा समावेश राहणार आहे.गुडघ्याच्या शस्त्रक्रिये नंतर रूग्णांना सी.पी.एम.मशीन द्वारे फिजियोथेरपी करावी लागते.या उपकरणा द्वारे रुग्ण घरच्या घरीच फिजियोथेरपी करू शकतो. या उपकरण बैंक सेवेचा प्रारंभ स्थानीय रामदेवबाबा श्यामबाबा मंदिर परिसरात करण्यात आला.यावेळी मंदिराचे अध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल,सचिव दीपक गोयनका, महाराष्ट्र प्रादेशिक मारवाड़ी सम्मेलनचे प्रांतीय महामंत्री निकेश गुप्ता,जिल्हाध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, राजस्थानी सेवा संघाचे माजी अध्यक्ष सुनील वर्मा, सालासर बालाजी सेवा समिती अध्यक्ष शैलेंद्र कागली वाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महानगरातील अर्थोपेडिक रुग्णांनी या सुविधेचा परत होणारी नाममात्र अनामत रक्कम जमा करून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. इच्छुकांनी या वैद्यकीय उपकरण संदर्भात गुप्ताज इंडस्ट्रीज अँड इंजीनियरिंग,तिलक रोड येथे संपर्क करण्याचे सांगण्यात आले.हा उपक्रम सहयोगकर्ता श्रीमती मूर्तिदेवी गुलाबचंदजी गुप्ता,स्व पुष्पाबाई रामेश्वरलाल जोशी यांच्या स्मृतीत जोशी परिवारच्या वतीने व स्व राजकुमार गुप्ता यांच्या स्मृतीत गुप्ता परिवार व संत तुकाराम हॉस्पिटल यांनी साकार केला. या प्रारंभ प्रसंगी शाखा अध्यक्ष राजकुमार शर्मा, जिल्हा महामंत्री एड,सुरेश अग्रवाल,शहर महामंत्री संतोष छाजेड़,बजरंगलाल अग्रवाल, सुनील बाजोरिया, हरीश खंडेलवाल,रोहित केडिया,कुंजीलाल सुनारीवाल समवेत बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.