भारतीय रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचं घोषित केल्यानंतर आतापर्यंत ९७ पूर्णांक ६२ शतांश टक्के नोटा बँकिंग प्रणालीमध्ये परत आल्या आहेत, आणि आता केवळ ८ हजार ४७० कोटी रुपये किमतीच्या २ हजार रुपयांच्या नोटा लोकांकडे शिल्लक असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
१९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यावेळी चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांचं एकूण मूल्य ३ लाख ५६ हजार कोटी इतकं होतं. तर २९ फेब्रुवारी २०२४ रोजी ते ८ हजार ४७० रुपयांवर घसरल्याचं यात म्हटलं आहे. दरम्यान, २ हजार रुपयांच्या नोटांची कायदेशीर वैधता अद्याप कायम असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
About The Author
Post Views: 82