जम्मू काश्मीर येथील आनंतनाग जिल्ह्यातील 8 व्या शतकातील मार्तंड सूर्यमंदिराचा जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्यात येणार आहे. हे मंदिर भारतातील सर्वांत जुने सूर्यमंदिर आहे. सम्राट ललितादित्य मुक्तपाद यांनी हे मंदिर उभारले होते. त्यानंतर मध्य युगात मुस्लिम शासक सुलतान सिंकदर शहा मिर याच्या आदेशावरून हे मंदिर उद्धवस्त करण्यात आले होते. या मंदिराचे […]
Day: April 2, 2024
वऱ्हाडी कथा : पंगत
संज्या हा आकोला जिल्ह्यातल्या माना या गावाचा. एक वलीतातला सधनं कास्तकार म्हनूनसन्या गावात त्याची ओयख. त्याचं मॅट्रीक लोग मान्यातचं शिक्षण होयेलं राह्यते.अन बारावी लोग तालुका मुर्चापूरले. त्याले नवकरी करनं आवळतं नसल्यानं . थो बारावी नंतर शिक्षण सोळूनं देते .अन वावराकळे लक्ष द्याले लागते. त्याची दा एक्कर जमीनं वलीता खालची असते. […]
चाचेगिरीचा अड्डा – सोमालिया
आफ्रिका खंडात उत्तर-पूर्व भागात असलेला सोमालिया हा एक छोटा देश. त्याचा उत्तरेकडील एक भाग गेंड्याच्या शिंगाप्रमाणे असल्याने सोमालियाला ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ असे नाव आहे. प्रत्येक देशाचे काहीतरी एक वैशिष्ट्य असते. या छोट्या सोमालिया देशाचे वैशिष्ट्य म्हणजे जगात एकूण जेवढी समुद्री चाचेगिरी चालते, त्याच्या नव्वद टक्के चाचेगिरी सोमाली पायरेट्स (चाचे) करतात […]
निठारी हत्याकांड
भारतात घडलेली अत्यंत घृणास्पद घटना म्हणजे दिल्लीजवळच्या नोएडा इथे घडलेले मुला-मुलींचे खून. भारतात दरवर्षी ४५ हजारांच्या वर गरीब मुलं बेपत्ता होत असतात. अनेकदा या सगळ्याच मुलांची पोलीस ठाण्यात बेपत्ता होण्याची कुठलीही अधिकृत नोंद झालेलीही नसते. नोएडाजवळच्या निठारी नावाच्या छोट्याशा खेड्यातली ३० ते ३८ मुलं हरवलेली असताना पोलीस ठाण्यात मात्र फक्त […]
लोकांचा शिक्षणापेक्षा पान, तंबाखू, मादक पदार्थांवर जास्त खर्च
गेल्या दहा वर्षांत पान, तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन वाढले आहे आणि लोक त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा अशा उत्पादनांवर खर्च करत असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत एकूण घरगुती खर्चापैकी पान, तंबाखू आणि मादक पदार्थांवर होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याचे कौटुंबिक उपभोग खर्च […]