वेबसाइटवर होणार वर-वधूची नोंदणी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
अकोला ■ पाटील समाज वर वधू सूचक मंडळातर्फे पाटील समाजात लग्न जुळविणे सोपी व्हावे, एका क्लिकवर योग्य स्थळाची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी वेबसाईट काढण्याचा निर्णय घेण्यात आला
जुने शहरातील वानखडे नगर येथे पाटील समाज मंडळाची विविध विषयावर बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी समाजाचे मेळावे होतील तेथे लॅप टॉप ठेऊन वेबसाईडवर वर-वधूचि नोंदणी करून घेणे, समाजातील जास्तीत जास्त मुला मुलींचे आदर्श व सामूहिक लग्न लावून देणे, अकोला जिल्हा जे मान्यवर घरोघरी जाऊन लग्न जुळवितात त्यांना मदत करणे, त्यांच्या कार्याला गतिशिल करणे, जुने शहर पाटील समाज वर वधू सूचक मंडळाचे रजिस्ट्रेशन करून वेबसाईट डेव्हलप करणे या विषयावर चर्चा होवून याची जबाबदारी राहुल वानखडे रेणुका नगर व गणेश चितोडे मलकापूर यांना देण्यात आली.
यावेळी सुभाष पाटील म्हैसने यांनी पाटील मंडळाने केलेल्या २ वर्षातील आढावा सादर केला. मंडळाने आतापर्यंत ३३ विवाह जुळवून आणले असून त्यापैकी बरेच विवाह आदर्श लावण्यात आले. यंदाच्या वर्षात आतापर्यंत ३ विवाह जुळवून आणले असून त्यापैकी एक विवाह हा चहा- नाश्त्यावर लावण्यात आल्याचे सुभाष पाटील यांनी यावेळी संगितले.
या बैठकीला अध्यक्ष म्हणून योगायोग पाटील समाज वधु वर सूचक मंडळाचे अध्यक्ष अशोक अमानकर उपस्थित होते. यावेळी उद्योजक
विवेक पारस्कर, डॉ. गजानन माळी, प्रा. डी. वाय. पाटील, योगेश ढोरे, सुभाषराव पुंडकर, गजानन हरणे, मंचीतराव पोहरे, मंगला म्हैसने, सुनीता मेटांगे, वसंत माळी, अरुण खोटरे, अॅड. संतोष गोळे यांनी महत्वाच्या सूचना मांडल्या. कार्यक्रमाचे आयोजन पाटील समाज वधु वर सूचक मंडळ जुने शहर यांनी केले होते.
या बैठकीला डॉ तेजराव नराजे, चंद्रकांत ताठे, माधुरी क्षिरसागर, सुनंदा नाराजे, विष्णू महल्ले, अशोक भिलकर, वसंतराव पोहरे, अरुण साबळे, गजानन धोटे, कैलास गोळे, राजेश दांदळे, विनोद दांदळे, मधुकर सावरकर, मधुकर अढाऊ, शेषराव लखाडे, अशोक पाटील, नरेंद्र घोम, दिनकर पाटील, रवींद्र दांदळे, गजानन डोंगरे, यश म्हैसने, इश्वर देशमुख, प्रशांत राऊत, डॉ नागोराव महल्ले, अड विद्याधर झामरे, योगेंद्र दांदळे, प्रवीण काळे, चंद्रशेखर वानखडे, दामोधर कान्हेरकर, दिलीप बढे, यांचेसह मोठ्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक सुभाषराव पाटील म्हैसने यांनी तर संचालन प्रा गोपाल साबळे, आभार डॉ. अशोक ओळंबे यांनी केले.