अकोली (जहागीर) ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही असे उद्गार प्रकाश भारसाकळे आमदार आकोट विधानसभा यांनी अकोली जहागीर येथे ग्रामीण ज्येष्ठ नागरिक संघाचे आमसभेत काढलेत पुढे बोलतांना त्यांनी ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा आरसा असून त्यांचा समाजात यथोचित सन्मान व्हायला हवा असे सांगितले सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम उकळकर होते. व्यासपीठावर फेस्कॉमचे अतिरिक्त मुख्य सचिव अभि.विनायकराव पांडे, विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे उपाध्यक्ष ना.मा मोहोड, कॅप्टन सुनील डोबाळे राजेश नागमते यांची उपस्थिती होती.
साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म या प्रार्थनेनंतर आचल सरदार या विद्यार्थीनीच्या सुमधुर स्वागत गीताने सभेला प्रारंभ झाला अभि.विनायकराव पांडे यांनी केलेल्या शंखनादात प्रतिमा पूजन झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भीमराव जायले यांनी प्रास्ताविक केले तर उद्धव ठाकरे यांनी अहवाल वाचन केले सभेमध्ये कॅप्टन डोबाळे, अभि. विनायकराव पांडे, अतिरिक्त मुख्य सचिव फेस्कॉम पुरुषोत्तम गावंडे अध्यक्ष प्रादेशिक विभाग ना.मा. मोहोड उपाध्यक्ष, प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, नारायण अंधारे, राजेश नागमते, जयकृष्ण वाकोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सभेचे यथोचित सूत्रसंचालन राजेश डांगटे यांनी केले.

सभेला राजेश रावणकर गजानन अकोटकर, धनराज निपाणे, दाभाडे, सरपंच अरुण वाथे उपसरपंच पंकज ढेबरे ,माजी सरपंच बाळासाहेब जायले, माजी उपसभापती दामोदर सरोदे, वसंतराव साळुंके, प्रकाश गयधर, देविदास जायले, ग्रामपंचायत सदस्य चंदा निमकाळे मनिषा धर्म प्रा खंडारे सुधाकर गोठवाड, पांडुरंग डांगटे, उद्धव ढेमरे, , आणि ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक व तरुणांची मोठी उपस्थिती होती. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमलताई ठाकरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले अल्पोपहारानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.