श्री दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला द्वारा संचलित श्रीमती सूमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यी जयंती आणि कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सचिव सौ हेमलता ताई अंधारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सौ हेमलता ताई अंधारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर कृषिदिनानिमित महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच कृषिदिनानिमित शिर्ला (अंधारे) गावामधून महावि्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षदिंडी काढण्यात आली यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
