
देशातील १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ टक्के लोकांना साधी वाक्ये कशी लिहायची, वाचायची ते येत नाही. साधी बेरीज- बाकीही त्यांना येत नाही. तथापि, यातीलच १५ ते २४ वयोगटाचा रिपोर्ट मात्र समाधानकारक आहे. या वयोगटात अशा वर्गाचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. (National Sample Survey – 2022-23)
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणच्या २०२२-२३ च्या व्यापक वार्षिक सर्वेक्षणानंतर देशाचे हे चित्र समोर आले असून, या सर्वेक्षणात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे १३ लाख कुटुंबे आणि सुमारे १३ लाख लोकांचा समावेश करण्यात आला होता. केरळची स्थिती बऱ्यापैकी
राजस्थानचे २७ टक्के लोक, मध्य प्रदेशचे २२ टक्के लोक साधी बेरीज-वजाबाकी करू शकत नाहीत. बिहारमध्ये हे प्रमाण २४ टक्के, तर यूपीमध्ये २५ टक्के आहे. केरळमध्ये असे लोक फक्त २ टक्के आहेत. (National Sample Survey – 2022-23)
साधी वाक्ये लिहिता, वाचता न येणारे लोक
• राज्य प्रमाण
• महाराष्ट्र ११.८
• गुजरात १५.८
• मध्य प्रदेश २२.०
• हरियाणा १५.१
• छत्तीसगड १९.९
• झारखंड २१.२
• राजस्थान २७.४
• बिहार २३.६
• उत्तर प्रदेश २५.४
• पंजाब १६.५
किती लोकांकडे फोन, कोण ऑनलाईन बँकिंगमध्ये पुढे ?
• ९३.७% लोकांना त्यांच्या घरापासून ५०० मीटरच्या त्रिज्येत बस, टॅक्सी, कार, ऑटो उपलब्ध आहेत.
• ५८.७% दिल्लीतील लोकांकडे १ कि.मी.च्या आत मेट्रो किंवा ट्रेन उपलब्ध आहे.
• १५ वर्षांवरील ४० टक्के लोक इंटरनेटच्या वापराबद्दल अनभिज्ञ आहेत.
• ९५% लोकांकडे टेलिफोन किंवा मोबाईल आहे.
• ९७% शहरी लोकांकडे, ९४ टक्के ग्रामीण लोकांकडे फोन सुविधा आहे.
• १० टक्के घरांमध्ये (देशात) संगणक आहेत. शहरांत हे प्रमाण २२, तर खेड्यांत ४% आहे.
• १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केवळ ६०% लोकांना (देशभरातील) इंटरनेट कसे वापरतात ते माहिती आहे.
• ३८% लोकांना (देशातील) ऑनलाईन बँकिंग व्यवहार माहीत आहे.
• ६४ टक्क्यांसह चंदीगड ऑनलाईन बँकिंगमध्ये देशात आघाडीवर आहे.
• ६२ टक्क्यांसह तेलंगणा राज्य ऑनलाईन बँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.