Ayushman Bharat Yojana | केंद्र सरकारद्वारे नागरिकांसाठी अनेक आरोग्यसंबंधित योजना राबवल्या जातात. यापैकीच एक आयुष्यमान भारत योजना आहे. देशभरातील कोट्यावधी नागरिक या योजनेचा लाभ घेतात.
मोदी सरकारने या योजनेचा लाभ 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला होता. या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी सरकारकडून आयुष्मान भारत वय वंदन कार्ड दिले जाते.

संसदीय समितीने आयुष्मान भारत वय वंदन कार्डची वयोमर्यादा 70 वर्षांवरून 60 वर्षे करण्याची शिफारस केली आहे.
‘आयुष्मान कार्ड’ ऑनलाइन कसे काढायचे?
■ ‘आयुष्मान कार्ड’ बनवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करा.
■ अॅप डाउनलोड मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
■ त्यानंतर तुमची पात्रता तपासा.
■ पात्र असाल तर आधार ई-केवायसी करा.
■ आता फोटो अपलोड करा. या प्रक्रियेनंतर तुमचे ‘आयुष्मान कार्ड’ तयार होईल. तुम्ही mera.pmjay.gov.in या वेबसाइटवरून देखील कार्ड डाउनलोड करू शकता.
