राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची 4, 435 रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे . त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (12 मार्च) विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. (Chandrakant Patil on Recruitment for 4,435 posts of Assistant Professors)
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६च्या कलम १३५ (४) अन्वये राज्यातील विद्यापीठांचे वार्षिक लेखे व वार्षिक अहवाल आज विधानसभेत सभागृहासमोर ठेवले.#Maharashtra #BudgetSession2025 #अर्थसंकल्पीय_अधिवेशन #विधानभवन_मुंबई@CMOMaharashtra… pic.twitter.com/tUE3CHxYGl
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 12, 2025