दंश केला तूही मला क्या बात है; घाव झाले ताजे पुन्हा क्या बात है. पडत नाही पाऊसही शेतामधे; रक्त आहे झिरपत अता क्या बात है. पांढरे कपडे घालती ही श्वापदे; नग्न केला रे देश हा क्या बात है. – मिलिंद हिवराळे, अकोला , भ्र. ७५०७०९४८८२
Day: September 17, 2022
स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे – डॉ. सोमनाथ वडनेरे
रोटरीतर्फे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. रोटरी कल्ब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगाव यांच्या […]
मराठीचे महान रचनाकार : दया पवार
काही लेखक अशा प्रकारचे आहेत, जे त्यांच्या लेखन पासून साहित्याची संपूर्ण परंपरा फक्त बदलत आहेत. मराठीचे महान रचनाकार दगडू मारुती पवार उर्फ दया पवार एक असेच लेखक होते. दया पवार हे एक मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. दया पवार यांचे खरे नाव दगडू […]
देशात भेसळयुक्त दुध विकल जातय!
आपल्या जिवीतेसाठी तो स्वता:ची दुभती जनावरे विकु लागला आहे. त्यामुळे शहरात दुधच पोचत नाही. जे पोचतय ते खुपच कमी मात्रावर पोचत असल्याकारणाने शहरात भेसळ पसरवली जात आहे. मात्र या भेसळीमुळे कॅन्सर सारखा आजार होण्याची शक्यता आहे. देशात दुध भेसळीचा बाजार मांडला गेला आहे. त्यामुळे हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. दूध […]
मुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय कशी लावावी?
मुलांसमोर वाचन करामुलांमध्ये पुस्तके वाचण्याची सवय लावण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी रंगीबेरंगी आणि विविध प्रकारची पुस्तके आणावीत. तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर वाचन करा. मूल तुमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. असे केल्याने त्यांना शब्दांचा अचूक उच्चार करण्याचा प्रयत्न करण्याचे बळ मिळेल. हे त्याला पटकन बोलण्यास आणि वाचन शिकण्यास मदत करतील. मुलांमध्ये अनुकरण करण्याची प्रवृत्ती […]
मराठवाडा मुक्तिसंग्राम : स्वामी रामानंद तिर्थ यांचे नेतृत्व; अनेक मार्गांनी लढा पेटला
निजामशाहीने स्टेट काँग्रेसला अनेक मार्गानी दाबण्याचा प्रयत्न केला. स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाने या लढ्याला धार आली, त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात सुरु झाला, आणि लढाई अनेक मार्गानी सुरु झाली. स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन:दि. १६, १७ व १८ जून, १९४७ स्टेट काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन हैदराबाद व सिकंदराबाद या शहरांमध्ये असलेल्या मुशिराबाद […]
सकाळी पाणी का प्यावे?
पाणी पिण्याच्या बाबतीत अनेक प्रकारचे नियम सांगितले जातात. भरपूर पाणी पिल्याने त्वचा चमकदार होते, अन्नपचन होते असे तर सांगितले जातेच पण आजकाल तेवढेच न सांगता इतरही काही बाबी सांगितल्या |जायला लागल्या आहेत. त्यातली पाहिली म्हणजे पाणी शक्यतो कोमट असेल तर प्यावे फार थंड पाणी पिऊ नये. सकाळी भरपूर पाणी प्यावे […]
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
सातारा, दि. १५ : महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई पुरस्कृत, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा आयोजित व श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्यावतीने दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२२ रोजी फलटणमध्ये दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. यंदाच्या […]
राष्ट्रीय पोषण महिना अभियान
केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शासनाच्या इतर विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात […]