वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
पोबाईलच्या रेडिओ लहरी आणि टॉवरपासून निघणाऱ्या रेडिएशनकडे आपण सर्वच जण अनेक वर्षांपासून संशयाने पाहत आहोत. मोबाईल सेवेने जगात पाऊल टाकल्यानंतर या रेडिएशनची मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामाची चर्चा सुरू झाली. कोरोना काळात तर फाईव्ह जी तंत्रज्ञानाला थेटपणे कोराना संसर्गाचा प्रसार करणारा घटक म्हणून पाहिले गेले. दोन वर्षात अनेक ठिकाणी फाईव्ह जीची चाचणी करण्यात आली, म्हणूनच कोरोना वेगाने पसरला, असा दावा करण्यात आला.
फाईव्ह जीच्या लहरीला धोकादायक ठरविणाऱ्या अभ्यासावर बोलतानाशास्त्रज्ञ म्हणतात की, या अभ्यासात मेंदूवर लहरीचा परिणाम होत असल्याचे म्हटले आहे; पण हे रेडिएशन किंवा लहरी या मानवी त्वचेला भेदतात की नाही, याचा उल्लेख केलेला नाही.
– महेश कोळी
अर्थात फाईव्ह जी येण्यापूर्वी अशा प्रकारच्या रेडिएशनवर अनेक संशोधन झाले आहे. मोबाईल फोन आणि त्याच्या नेटवर्कसाठी निवासी इमारतींवर उभारण्यात येणाऱ्या टॉवर मुळे हानीकारक रेडिएशन बाहेर पडत असल्याचे वेळोवेळी सांगितले गेले. हे रेडिएशन जीव जंतूसह सर्वांच्याच आरोग्यासाठी मारक आहेत. या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या देशात २०११ मध्ये दळणवळण आण माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती नेमली. समितीने केलेल्या अभ्यासात मोबाईल फोन अणि टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमळे चिमण्या, मधमाशी आदींचे अस्तित्व धोक्यात येण्यास जबाबदार धरण्यात आले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात उंदरावर अभ्यास करण्यात आला. यात म्हटले की, मोबाईल फोनचे रेडिएशन हे प्रजनन क्षमतेवर परिणाम करण्याबरोबरच शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम करत असल्याचे सांगण्यात आले. सेल्यूलर फोन आणि टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी या शरीराच्या ऊतकांवर (टिश्यूज) परिणाम करतात, असेही म्हटले आहे.
संशोधकांच्या मतानुसार मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे ब्रेन ट्यूमर, कॅसर, आर्थरायटीस, अल्झामयर, हृदयविकार यासारख्या आजाराला निमंत्रण मिळते. साधारणपणे बहुतांश मोबाईल टॉवरचे रेडिएशन हे दोन ते तीन किलोमीटर परिसरात पसरतात. म्हणूनच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्यूनिकेशन्सने (डॉट) या रेडिएशनची किंवा सिग्नलची तीव्रता दहा टक्के कमी करण्याचा सल्ला दिला. अर्थात फाईव्ह जी तंत्रज्ञानाला संशोधकांनी नागरिकांकडून आणि अनेक स्वयंसेवी संस्थांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाच्या भोवऱ्यातून बाहेर ठेवले. त्यांच्या मते, ‘फाईव्ह जी’ साठी वापरण्यात येणारा स्पेक्ट्रम हा हानीकारक एक्सरे किंवा गामा रे सारख्या उच्च लहरीच्या स्पेक्ट्रम पातळीपेक्षा बऱ्याच प्रमाणात खाली आहे.
फाईव्ह जीच्या लहरीला धोकादायक ठरविणाऱ्या अभ्यासावर बोलताना शास्त्रज्ञ म्हणतात की, या अभ्यासात मेंदूवर लहरीचा परिणाम होत असल्याचे म्हटले आहे; पण हे रेडिएशन किंवा लहरी या मानवी त्वचेला भेदतात की नाही, याचा उल्लेख केलेला नाही. गेल्या काही वर्षात जगभरात मोबाईलचा वापर कैक पटीने वाढला आहे. अशावेळी मोबाईल रेडिएशन कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचे कारण ठरत असेल तर आतापर्यंत या आजारात प्रचंड वाढ झाली असती.
अर्थात, खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने देखील आगामी काळात मोबाईल फोन हे अनेक आजारांचेकारणठरू शकतात, असेही म्हटले आहे. म्हणून मोबाईल रेडिएशन ही चिंतेची बाब ठरत आहे. शास्त्रीय पातळीवर मोबाईल हा आरोग्याला हानीकारक आहे, असे सांगितले जात असले तरी मोबाईल फोनचा वापर केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.