वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आता यूआयडीएआयने ईमेल आयडीसह आधार कार्ड अपडेट करण्याचे सांगितले आहे. यामुळे तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे केला जात आहे कळण्यास मदत होणार असून गुन्हेगारीला देखील मोठया प्रमाणात आळा बसेल. यूआयडीएआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. आधारधारकांनी त्यांचा ई-मेल आयडी आधारशी लिंक केल्यास त्यांना मोठा फायदा होईल, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. आधार कार्डमध्ये तुमचा ई-मेल आयडी अपडेट किंवा लिंक करण्यासाठी जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल.
About The Author
Post Views: 66