ब्रिटेनमधील सुपर मार्केटमध्ये एका व्यक्तीला एक वेळा दोन टोमॅटो आणि दोन काकड्या खरेदी करता येणार आहेत. वेगवेगळ्या भाज्यांच्या विक्रीसाठी तेथील सरकारने काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. याचे कारण ब्रिटनमध्ये आयात केल्या जाणाऱ्या देशात यंदा शेतमालाचे उत्पादन घटले आहे. भारतात मात्र काही शेतमालाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्यामुळे भाव कोसळले असल्याने शेतकरी कमालीचा संकटग्रस्त झाला आहे. बाजारपेठांमध्ये कोबी, टोमॅटो, कांदा, बटाटा यांचे भाव मोठ्या प्रमाणावर घटले आहेत. भरपूर पिकवा आणि भाव पडल्याने तोट्यात जा, असे आजचे भारतीय शेतीचे स्वरुप बनले आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असून त्याबाबत गांभीर्याने विचार न केला गेल्यास या असंतोषाचा भडका उडू शकतो.
अलीकडेच समोर आलेल्या दोन घटना कृषीक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक अशा आहेत. पहिली घटना म्हणजे इंग्लंडमध्ये नुकतेच भाज्यांचे रेशनिंग सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार ब्रिटेनमधील सुपर मार्केटमध्ये एका व्यक्तीला एक वेळा दोन टोमॅटो आणि दोन काकड्या खरेदी करता येणार आहेत. याबाबतच्या वृत्तांनुसार, वेगवेगळ्या भाज्यांच्या विक्रीसाठी तेथील सरकारने काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. तसेच लोकांना केवळ दोन किंवा तीन भाज्याच खरेदी करता येतील, असे आवाहनही केले जात आहे. इंग्लंड हा शीतकटिबंधीय देश आहे. तेथील थंडीचा हंगाम हा शेतीसाठी अनुकूल नसतो. तापमानाचा पारा वेगाने खाली जात असल्याने त्या हवामानात पीकांचा टिकाव लागणे शक्य नसते. साहजिकच दरवर्षी या काळात मोरक्को आणि स्पेनसारख्या देशांमधून ब्रिटेनमध्ये भाज्यांची आयात केली जाते; परंतु यंदाच्या वर्षी कमालीच्या थंडीमुळे मोरक्कोमध्ये शेतकऱ्यांना टोमॅटोचे उत्पादनच घेता आलेले नाही. या थंडीचा फटका मोरक्कोमधील अन्य शेतमालाला आणि भाजीपाल्याच्या पिकांना बसला आहे. या पीकांचे उत्पादन कमी झाले आहे. जे काही शेतीपीक आले होते त्यांवरही पावसाने आणि पुराने पाणी फेरले आहे. स्पेनमधून ब्रिटनमध्ये आयात केल्या जाणाऱ्या भाजीपाल्याबाबतही तीच स्थिती आहे. वाढलेल्या गारठ्याचा फटका तेथील भाजीपाल्याला आणि फळांना बसला आहे. यावर्षी तेथे टोमॅटोच्या उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे तेथूनही ब्रिटनम ध्ये भाजीपाला येण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. जाणकारांच्या मते, जवळपास पुढील दीड ते दोन महिन्यांपर्यंत ब्रिटेनमधील परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ पुढील ८ ते १० आठवडे ब्रिटनच्या नागरिकांना शरीरासाठी पोषणद्रव्यांचा खजिना असणाऱ्या फळे आणि भाज्यांपासून वंचित राहावे लागणार आहे.
एकीकडे ब्रिटनमधील शेतमाल टंचाईची स्थिती असताना भारतात मात्र काही शेतमालाच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्यामुळे भाव कोसळले असल्याने शेतकरी कमालीचा संकटग्रस्त झाला आहे. बाजारपेठांमध्ये कोबी, टोमॅटो, कांदा, बटाटा यांचे भाव मोठ्या प्रमाणावर घटले आहेत. भाज्यांच्या भावांनी एकाएकी गटांगळ्या खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उत्पादनखर्च तर दूरच, पण तयार झालेला शेतमाल काढणी करुन, बाजारात आणून विकण्यासाठी येणारा खर्चही भरून निघणार नाही, इतक्या नीचांकी पातळीपर्यंत भाव घसरले आहेत. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची शेती करतात. काही जिल्ह्यांमध्ये तर टोमॅटो हे मुख्य पीक बनले आहे. या भागात पिकवले जाणारे टोमॅटो कोलकात्यापर्यंत पाठवले जातात; परंतु यंदा भावात घसरण झाल्याने बिहारमधील टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंताक्रांत बनला आहे. कारण इतक्या मोठ्या प्रम भाणावर उत्पादन घेतल्यानंतर फायदा तर सोडाच; पण शेतमजुरी आणि उत्पादनखर्चही भरून निघेल इतके उत्पन्न मिळत नाही. यामुळे टोमॅटोची शेती ही या शेतकऱ्यांसाठी भार बनली आहे.
सर्वांत भयंकर बातमी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून आली आहे. या जिल्ह्यातील बोरगावमध्ये राहणाऱ्या राजेंद्र तुकाराम चव्हाण या ५८ वर्षे वयाच्या
शेतकऱ्याची ही कहाणी आहे. जवळपास ५१२ किलो कांदा घेऊन चव्हाण नामक हा शेतकरी शेतापासून ७० किलोमीटर दूर अंतरावर असणाऱ्या सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये गेला; परंतु या बाजारात केवळ १ रुपये प्रति किलो दराने कांद्याची खरेदी सुरू होती. ते ऐकून चव्हाणांना धक्काच बसला; पण आता इतक्या लांब वाहतूक करून आणलेला कांदा परत घेऊन जाण्यात काहीच हाशिल नसल्याचा विचार करुन त्यांनी हा कांदा बाजार समितीत विकला. तेथील सर्व खर्चाची वजावट करुन २.४९ रुपये एकूण बिल झाले. त्यानुसार चव्हाणांच्या हातामध्ये केवळ २ रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेशही पोस्ट डेटेड म्हणजे १५ दिवसांनी वठणारा होता. हातात पडलेला तो धनादेश पाहून चव्हाणांच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकणार नाही! माध्यमांशी बोलताना चव्हाणांनी याचा हिशेब सांगितला. त्यानुसार १ रुपये प्रति किलो प्रमाणे आडत्याने ५१२ रुपयांचा हिशेब केला. त्यातील ५०९.५० रुपये परिवहन शुल्क, मालाची चढाई – उतराई आणि वजनासाठीचे शुल्क यांची त्यातून वजावट करुन घेतली आणि २.४९ रुपये तुम्हाला देता येतील असे सांगितले.
वास्तविक पाहता कांदा या शेतमालाची ताकद इतकी मोठी आहे की, दिल्लीच्या तख्तालाही या पीकाने धक्का दिल्याची नोंद इतिहासात आहे; परंतु आज हाच कांदा शेतकऱ्यांना ओक्साबोक्शी रडण्यास भाग पाडत आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही देशातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ मानली जाते. संपूर्ण आशिया खंडात या बाजारपेठेची ओळख आहे. या बाजारपेठेत गेल्या दोन महिन्यामध्ये काद्याच्या ठोक भावांमध्ये ७० टक्क्यांची घसरण झाली आहे. यामागच्या कारणांचा शोध घेतला असता असे दिसते की, बाजारात कांद्याची आवक दुप्पट झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी लासलगावच्या बाजारात दररोज १५ हजार क्विंटल कांद्याची आवक होत होती. ती आता तब्बल ३० हजारांवर गेली आहे. या वाढलेल्या पुरवठ्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. काही महिन्यांपूर्वी १८५० रुपये क्विंटल या दराने विकला जाणाऱ्या कांद्याचे भाव आज अवघ्या ५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत.
शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळणे ही शेतकऱ्यांपुढील आजही सर्वांत मोठी समस्या आहे. पेरणीपासून कापणीपर्यंतच्या काळासाठी जितका पैसा शेतकरी खर्च करत असतो त्याच्या निम्मा पैसाही जर ते पीक विकून वसूल होणार नसेल तर शेती करायची कशासाठी, असा प्रश्न त्याला पडतो. विशेषतः छोट्या शेतकऱ्यांपुढे ही समस्या अधिक बिकट आहे. कारण त्यांचा शेतमाल तर बाजार समित्यांपर्यंतही जात नाही. मधल्या मध्ये आडते, दलाल यांच्याकडूनच त्यांची अत्यल्प दरात खरेदी केली जाते. यामुळेच आज शेतकरी कर्जात बुडत चालला आहे. देशभरातील शेतकऱ्यांवर आज बँकांच्याबरोबरीने सावकारांचे, खासगी वित्तसंस्थांचे कर्ज आहे. विद्यमान केंद्र सरकारने किमान हमीभावाच्या किमतीमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ केली आहे; पण त्याच वेळी शेतीचा उत्पादनखर्चही वाढला आहे. तसेच सरकारकडून धान्यखरेदी केली जात असेली त्याला बरेचदा विलंब होतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे तितका वेळ थांबणे शक्य नसल्याने शेतकरी हा शेतमाल अडते-दलालांना विकून टाकतात. याखेरीज शेतकऱ्यांच्या जमिनीवरील मालकी हक्काचा वादही बराच जुना आहे. आज देशातील शेतजमिनीपैकी बरीचशी जमीन ही बडे शेतकरी, सावकार आणि जम ीनदारांकडे आहे. छोटे शेतकरी ती कसण्यासाठी घेऊन त्यावर आपल्या काबाड कष्टाने मळा फुलवातत; पण बाजारात भावच न मिळाल्यास यासाठीचा खर्च पाण्यात जातो. दुसरीकडे मोठे शेतकरी ही प्रभावशाली असल्यामुळे ते शासनाच्या कृषीविषक योजनांचा घतानाच शतकऱ्यानाहा आता काळानुरुप काहा बदल करण्याची गरज आहे. पारंपरिक शेतीपद्धतीत बदल प्राधान्याने करावयास हवेत. मातीपरीक्षण आणि ठिबक सिंचन यांसारख्या संकल्पा प्रत्यक्षात अमलात आणल्या पाहिजेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पीक नियोजन. आपल्याकडील शेतकरी बहुतेकदा यावर्षी एखाद्या पीकाला चांगला भाव मिळाल्याचे दिसले की त्याच पीकाच्या मागे धावतात. त्यातून पुढच्या वर्षी हे पीक तयार होते तेव्हा प्रचंड उत्पादन झाल्याने भाव कोसळतात. त्यामुळे पीकाचे नियोजन करताना परिसराचा आणि एकंदर बाजारपेठेचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. यामध्ये गहू आणि तांदुळ या पारंपरिक नगदी पिकांऐवजी अन्य पीकांकडेही लक्ष वळवणे गरजेचे आहे. आज अनेक राज्यांमध्ये सोयाबीन, सूर्यफुल, डाळींची शेती करुन शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. याखोरीज मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि पशुपालन या पूरक किंवा जोडव्यवसायांची शेतीला साथ असलीच पाहिजे. यासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांचा लाभ घेतला पाहिजे. डिजिटलायजेशनचा, इंटरनेटचा फायदा करुन घेतला पाहिजे. या सर्वांतनू शेतीचे अर्थकारण नकारात्म कतेकडून सकारात्मकतेकडे जाण्यास मदत होईल.
नवनाथ वारे, शेती अभ्यासक