नव्या संशोधनातील निष्कर्ष
लंडन : लहान मुलांच्या वाढीसाठीही पोषक आहाराचे महत्त्व मोठे आहे. मुलांची बुद्धिमत्ता, आकलनशक्ती पावरही असा आहार परिणाम करीत असतो. आरोग्यदायी अन्नपदार्थ सेवनाने मुलांचे वाचन कौशल्य वाढू शकते. असे संशोधन म्हटले आहे.

शाळेच्या पहिल्या तीन वर्षांत मुलांना चांगला आहार दिला, तर त्यांचे वाचनकौशल्य सुधारते, असा त्यांचा दावा आहे. फिनलंडमधील जावस्कल्या विद्यापीठ व इस्टर्न फिनलंड या संस्थांतील वैज्ञानिकांनी सहा ते आठ वयोगटातील १६१ मुलांची पाहणी केली असता, त्यांना पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यात आहारामुळे सुधारणा दिसून आली. यात त्या मुलांनी केलेल्या आहाराच्या टिप्पणीचा वापर करण्यात आला. त्यात काही प्रमाणित चाचण्या वापरण्यात आल्या. बाल्टिक सागरी भोजन व फिनीश पोषण आहार यांची शिफारस त्यात करण्यात आहे. मुलांना भाज्या, फळे, बेरी, मासे, पूर्ण अन्नधान्ये व असंपृक्त मेद, शर्करायुक्त पदार्थ दिले तर ते आरोग्यास चांगले मानले जातात. ज्यांच्या आहारात हे पदार्थ नसतात त्यांच्या वाचनकौशल्यावर परिणाम होतो. या अभ्यासात असे दिसून आले की, दुसरी व “तिसरीच्या मुलांमधील वाचनकौशल्ये त्यामुळे वाढली. त्यांची पहिलीतील वाचन कौशल्ये काहीही असली तरी त्यांच्यात सुधारणा दिसून आली आहे. आरोग्यवर्धक आहारामुळे पहिल्या इयत्तेपासून वाचन कौशल्ये सुधारतात. ज्यांचा आहार चांगला नसतो त्यांची कौशल्ये फार चांगली राहत नाहीत. सामाजिक- आर्थिक स्थिती, शारीरिक हालचाली, शारीरिक तंदुरुस्ती हे घटकही यात महत्त्वाचे ठरतात, असे संशोधक एरो हापला यांनी सांगितले.