
डेस्क जॉब हा आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे. ज्यामुळे सध्या अनेकांना पाठदुखी, मानदुखी, खांदेदुखी यासारख्या शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. जर तुम्हीदेखील डेस्कम जॉब करत असाल तर तुम्हीदेखील काही साधेसोपे व्यायामप्रकार करणे गरजेचे आहे. जे तुमच्या शरीराला बऱ्याच काळासाठी डेस्क जॉब केल्याने उद्भवणाऱ्या समस्यांपासून सुटका देऊ शकतील.
मानेचे व्यायामप्रकार : तुमचे दोन्ही हात डोक्यामागे ठेवा. हाताच्या दबावाला रोखत तुमचे डोके पाठच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करा. काही मिनिटांकरता याच मुद्रेमध्ये रहा. थोड्या वेळासाठी ही प्रक्रिया तशीच चालू ठेवा. डेस्कच्या समोर बराच वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्यानंतर तुमचे डोके डाव्या, उजव्या बाजूला आणि वर, खाली अशा दिशांमध्ये फिरवा. आणि दोन्ही बाजूंना झुकवा. अगदी हळूवारपणे या क्रिया करा. काही वेळाकरता हा व्यायाम पुन्हा पुन्हा करत रहा.

खांद्याचा व्यायाम : तुमच्या डोक्यामागे एक पेन किंवा पेन्सिल ठेवा आणि त्याचं संतुलन राखण्यासाठी खांद्यांचा वापर करा. तुमच्या खांद्याला वरच्या बाजूला न्या आणि काही सेकंदांसाठी त्याच अवस्थेत रहा. या प्रक्रियेला पुन्हापुन्हा करत रहा. तुमच्या दोन्ही हातांना खांद्याच्या सरळ रेषेत ठेवून त्यांना दोन्ही बाजूला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दोन्ही हातांना कोपऱ्यात दुमडून खांद्यावर ठेवा. आणि याच स्थितीमध्ये दोन्ही हात पुढच्या व मागच्या बाजूला गोलाकार रीतीने फिरवा.
शरीराला साध्या मुद्रेत ठेवा तुमच्या खुर्चीला ॲडजस्त करत तिला अशा एका उंचीपर्यंत ठेवा की तुम्ही त्या स्थितीत अगदी आरामात ताठ बसू शकाल. तसेच तुमच्या आणि कॉम्प्युटर स्क्रीनच्या दरम्यान डोळ्यांमध्ये समान अंतर असेल. मांडीची घडी घालून बसण्याचा प्रयत्न करा. तुमच्या शरीराला अशा मुद्रेत ठेवा ज्यामध्ये तुम्हाला आरामदायक वाटू शकेल.

पाय, तळव्यांचा व्यायाम : तुमच्या पायांना भिंतीच्या दिशेने ताठ करा. गुडघे न वाकवता तुमच्या हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. याच अवस्थेत पायांना वर खाली करत जॉगिंग करा. मोकळ्या वेळेत पाय हवेत फिरवा. जेणेकरुन पायाच्या मांसपेशी मुक्त होऊ शकतील.