देशात सध्या अन्नधान्य भेसळ हे एक गंभीर आव्हान आहे आणि आज त्याचे भयंकर परिणाम म्हणून अनेक रोग सर्वांसमोर आहेत. पतंजलीने देशातील अन्नधान्यांमधील कीटकनाशके आणि रसायने शोधण्यासाठी एक नवीन संशोधन केले आहे, जे प्रसिद्ध ‘मायक्रोकेमिकल जर्नल’ने प्रकाशित केले आहे. पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, या संशोधनाच्या माध्यमातून लोक आता अन्नाच्या गुणवत्तेचे स्वतः विश्लेषण करून अन्न सुरक्षा सुनिश्चित करू शकतील. तुटपुंज्या आर्थिक लाभापोटी लोक दुष्परिणामांचा विचार न करता अन्नपदार्थात भेसळ करतात. त्यामुळे अन्नपदार्थ दूषित झाले आहेत. कडधान्ये, धान्य, दूध, मसाले, तुपापासून ते भाज्या, फळांपर्यंत सर्वच वस्तूंमध्ये भेसळ होत आहे. आपल्या शरीराचे पोषण करण्यासाठी आपण अन्नधान्यांवर पूर्णपणे अवलंबून असतो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने, स्निग्धांश कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिज क्षार आदींची नियमित मात्रा आवश्यक असते, जी आपल्याला अन्नधान्यांपासूनच मिळते. अन्नधान्यातील भेसळीचा खेळ संपवण्यासाठी पतंजलीने भेसळविरहित स्वदेशी खाद्यपदार्थ तयार केले तर आहेतच, मात्र पतंजलीचे हे नवीन संशोधन भेसळयुक्त अन्नधान्यांपासून मुक्ती मिळवून देणार आहे. आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांच्या टीमचा आणि पतंजली संस्थेच्या संशोधनाचा अभिमान आहे, ज्यांच्या मदतीने लोक अन्न सुरक्षा सुनिश्चित करतील आणि जागतिक विकासात देतील. असे ते म्हणाले.
