देशात राष्ट्रवादाच्या नावाखाली लढणाऱ्या वर्गाला संस्कृत ही केवळ १४ हजार लोकांची मातृभाषा आहे, हे जाणून आश्चर्य वाटेल. डिजिटल युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अजूनही प्रयत्न केले नाहीत तर कदाचित २२ अनुसूचित भाषाही त्यांचे अस्तित्व वाचवू शकणार नाहीत. आपल्या मातृभाषेत बोलायला इथले लोक टाळतात, हे भारताचे दुर्दैव आहे. जर कोणी मातृभाषेत बोलले तर त्याला अडाणी समजले जाते, त्याच्या कौशल्याचा अवमान केला जातो. इंग्रजी मानसिकतेने भाषेला सामाजिक स्थितीशी जोडले आहे.
आज २१ फेब्रुवारी रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा केला जातो. जगभरातील भाषा आणि सांस्कृतिक विविधता जोपासणे आणि त्याबाबत जागरूकता निर्माण
करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. युनेस्कोने दि. १७ नोव्हेंबर १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. जगात सुमारे ७ हजार भाषा बोलल्या जातात. भारतातही प्रामुख्याने २२ भाषा बोलल्या जातात. भारतात जवळपास १३००च्या आसपास मातृभाषा आहेत. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या दिवशी जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने शिक्षण आणि साहित्याशी निगडित लोक विविध भाषांबद्दल चर्चा करतात. मातृभाषेबद्दल जागरूकता निर्माण करणे, भाषिक विविधता जोपासणे, त्याचे महत्त्वदेखील अधोरेखित केले जाते. जगात काही मातृभाषा लोप पावत असल्याबद्दलही जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जाते. मातृभाषेचे संवर्धन करणे, मातृभाषेचा प्रचार-प्रसार करण्याबाबत धोरण ठरवले जाते.
भारताच्या पाकिस्तानची फाळणीनंतर निर्मिती झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग होते. पूर्व बांगलादेशमध्ये उर्दू आणि पश्चिम बांगलादेशमध्ये बंगाली भाषिकांचे प्रमाण अधिक होते. तत्कालीन पाकिस्तान सरकारने भाषा धोरण लागू करून पाकिस्तानची अधिकृत भाषा म्हणून उर्दूला मान्यता दिली होती. पाकिस्तान सरकारच्या या धोरणाच्या विरोधात ढाका विद्यापीठात
विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ढाका विद्यापीठातील आंदोलनावर पोलिसांनी २१ फेब्रुवारी १९५२ रोजी गोळीबार केला होता. आंदोलनाच्या परिणामी पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागले आणि बंगाली भाषेलाही मान्यता द्यावी लागली होती. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी युनेस्कोने सन २००० पासून दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा दिवस साजरा करण्याची कल्पना कॅनडामध्ये राहणारे बांगलादेशी रफीकुल इस्लाम यांनी दिली. बंगाली भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे यासाठीही हा दिवस स्मरणात ठेवला जातो. सन १९५२मध्ये ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी २१ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले होते. यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या स्मरणार्थ युनेस्कोने मातृभाषा दिनासाठी हा दिवस निवडला. वर्ष २०२२साठी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची थीम बहुभाषिक शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर : आव्हाने आणि संधी ही होती. २०२२ – २०३२ हे दशक संयुक्त राष्ट्रांकडून देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून साजरे केले जाईल.
लहानपणी ज्या भाषेशी आपला परिचय होतो, ज्या भाषेच्या सान्निध्यात आपण राहतो, वाढतो, त्या भाषेला मातृभाषा म्हणतात. युनायटेड नेशन्स – युएनच्या अहवालानुसार जगभरात बोलल्या जाणाऱ्या ६००० भाषांपैकी जवळपास २६८० भाषा ४३ टक्के लुप्त होत आहेत. लुप्त होण्याचे प्रमाण खूप जास्त आणि वेगवान आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी दोन भाषा नाहीशा होत आहेत. त्यामुळे प्रादेशिक सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डिजिटल क्रांतीत मागे पडलेल्या छोट्या भाषा त्यांचे अस्तित्व वाचवू शकलेल्या नाहीत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर शंभरहून कमी भाषा वापरल्या जातात.
जागतिक स्तरावर, लहान देशांच्या मातृभाषा वेगवेगळ्या प्रदेशात प्रचलित आहेत. जागतिक डेटा माहितीनुसार, भारताची अधिकृत भाषा असण्यासोबतच, सात देशांमध्ये मातृभाषा म्हणून हिंदीला प्रमुख स्थान आहे. यामध्ये फिजी, न्यूझीलंड, जमैका, सिंगापूर, त्रिनिदाद टोबॅगो, मॉरिशस इ. देशातही या भाषा आहेत. पापुआ न्यू गिनीसारखे क्षेत्र उच्च भाषिक विविधतेची उदाहरणे आहेत. ३.९ दशलक्ष लोकसंख्येद्वारे येथे बोलल्या जाणार्या भाषांची संख्या सुमारे ८३२ आहे. या भाषा ४० ते ५० भिन्न भाषा कुटुंबातील आहेत. जगातील सुमारे ६० टक्के लोक फक्त ३० प्रमुख भाषा बोलतात. भारतासारख्या विशाल बहुभाषिक देशात १९,५६९ भाषा किंवा बोली मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. १२१ कोटी लोकसंख्येच्या भारतात १२१ भाषा अशा आहेत, ज्या १०,००० किंवा त्याहून अधिक लोक बोलतात. संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या २२ भाषा या भारतातील ९३.७१ टक्के लोकांच्या मातृभाषा आहेत. भारतातील ९० टक्के भाषा बोलणाऱ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. १३६५ मातृभाषांपैकी बहुतेक प्रादेशिक भाषा आहेत. भारत हा प्राचीन काळापासून बहुभाषिक देश आहे, पण ही संस्कृतीही आता धोक्यात आली आहे. भारतातील ४३ कोटी हिंदी भाषकांपैकी केवळ १२ टक्के लोक द्विभाषिक आहेत, तर ९७ दशलक्ष लोकांपैकी १८ टक्के लोक बंगाली आहेत. देशात राष्ट्रवादाच्या नावाखाली लढणाऱ्या वर्गाला संस्कृत ही केवळ १४ हजार लोकांची मातृभाषा आहे, हे जाणून आश्चर्य वाटेल. डिजिटल युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण अजूनही प्रयत्न केले नाहीत, तर कदाचित २२ अनुसूचित भाषाही त्यांचे अस्तित्व वाचवू शकणार नाहीत. कारण आपली शैक्षणिक पात्रता अधिक वाढली, त्याबरोबरच मीपणा – अहंकारही वाढला आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेत बोलायला इथले लोक टाळतात, हे भारताचे दुर्दैव आहे.
कृष्णकुमार निकोडे, गडचिरोली