पातूर : पातूर येथे संत सेवालाल सभागृहात पुंडलिक महाराज एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हादराव बोचरे लिखित गिल्ली मिसळ साहित्याची सळमिसळ या गद्य पद्य कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा जिल्ह्यातील समस्त साहीत्यीकांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितित उत्साहात संपन्न झाला .
लेखक व कवी प्रल्हादराव बोचरे यांचे हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे . मागिल वर्षीचा आमचे पि. एम . हे आत्मचरित्र साहीत्यीक आणि वाचकांमध्ये वाचनिय ठरले होते .
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मणराव तायडे हे होते . पुंडलिक महाराज संस्थान मूर्तिजापूरचे विश्वस्त विठ्ठलराव पातोंड, अंकूर साहीत्य संघाचे हिम्मतराव ढाळे, तुळशिराम बोबडे, देवानंद गहिले, राजाभाऊ देशमुख, संजय गावंडे, अनिल दाते, क्रांतीरत्न प्रकाशनचे प्रकाश अंधारे, मुखपृष्ठकार योगेश शेवलकार , शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड, संचालक विजय टोहरे तसेच एडीपी अमेरीका कंपनीचे सिनीयर डायरेक्टर अतुल बोचरे , शिक्षक पतसंस्थेचे संचालक देवानंद मोरे, मारोती वरोकार, सुरेश बंड, संजय बरडे, संजय इंगळे, अरविंद आगाशे यां प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितित प्रकाशन सोहळा संपन्न झाला .
यावेळी जिल्ह्यातील अंकूर साहीत्य संघाची साहीत्यीकांची मांदियाळी आवर्जून उपस्थित होती .
कवी प्रल्हादराव बोचरे यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी केलेल्या लेखनाला उपस्थितांनी भरभरून कौतुक केले . यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले व भावी लेखनकार्याला शुभेच्छा दिल्यात .
यावेळी उपस्थितांमध्ये एडीपी अमेरीका या कंपनीचे सिनियर डायरेक्टर अतुल बोचरे यांनी साहित्यांकानी सद्याचे मोबाईल युगामुळे लहान मुलांवर होणाऱ्या दूरगामी परिणामांसाठी बालसाहीत्य ची मोठ्या प्रमाणात निर्मिती व्हावी अशी आर्जव साहीत्यीकांना केली . कार्यक्रमाचे संचलन बळीराम वानखडे व विवेकानंदन सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश बोचरे यांनी केले .