तुम्हाला माहिती आहे काय, की भारतातील जवळपास ६५ टक्के जलसाठे कोरडे होत चाललेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चालली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासणार आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काही करू शकता, अशा गोष्टी आहेत. आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे, ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवण सुरू करणे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय ?
रेन वॉटर हार्वेस्टिंग, ही पावसाचे पाणी गोळा करण्याची प्रक्रिया आहे, ज्यावर पाऊस पडतो अशा कोणत्याही पृष्ठभागाचे हे पावसाचे पाणी असू शकते. त्यानंतर हे पाणी गाळले जाते आणि नंतर वापरासाठी साठवले जाते.
रेन वॉटर हार्वेस्टिंगचे कोणते फायदे आहेत ?
गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे इतर फायदे आहेत जसे- हे ‘स्टॉर्म वॉटर रन-ऑफ’ नियंत्रित करते मुसळधार पाऊस आणि पुराच्या वेळी आपल्याला दिसेल की पावसाच्या पाण्याने बर्यातच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जाते. परंतु, जेव्हा आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग ची व्यवस्था असते तेव्हा पाणी वाहून जात नाही, नंतर वापरण्यासाठी ते सुरक्षितपणे गोळा केले जाते. पूर कमी करण्याचा देखील हा एक चांगला मार्ग आहे.
हे शेती आणि वनस्पतींसाठी चांगले आहे. शासकीय महामंडळांद्वारे आपल्याला पुरविल्या जाणाऱ्या पाण्याला, आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी नेहमीच, थोडासा क्लोरीनचा वापर केला जातो. पावसाचे पाणी शुद्ध आणि इतर अनेक प्रदूषक आणि मानवनिर्मित दूषित घटकांपासून मुक्त असते. शुद्ध असल्या कारणाने ते जमिनीतील आणि वनस्पतींमधील मीठ वाहून नेऊ शकते आणि त्यामुळे खूप महत्वाचे आणि फायदेशीर ठरते, पाण्याच्या बिलावर होणारा आपला खर्च कमी होईल. असा अंदाज आहे की प्रत्येक व्यक्ती दररोज सरासरी ८०-१०० गॅलन पाणी वापरते. तर मग, ३ लोक असलेल्या घरासाठी आपण दररोज ३०० गॅलन पाणी वापरता. जर पाण्याची कमतरता निर्माण झाली तर पाण्याची किंमत वाढेल, परंतु रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण हे पूर्णपणे टाळू शकता. आपल्याकडे आपला स्वतःचा सुरक्षित आणि विनामूल्य असा पाणीसाठा असेल आणि आपल्याला अतिरिक्त पाणी बिल भरण्याची चिंता करावी लागणार नाही.
रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमचे घटक :
रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम ही अशी गोष्ट आहे जी नंतरच्या वापरासाठी पावसाचे पाणी गोळा करते आणि साठवते. ह्यासाठी टाकी, पाईप्स, फिल्टर्स, प्युरिफायर आणि पंप असलेल्या जटिल प्रणाल्या असू शकतात किंवा अगदी फक्त पाणी साठवायचे बॅरल इतकी सोपी प्रणालीही असू शकते.
सामान्य रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टममध्ये सहसा खालील घटक असतात.
पाणलोट क्षेत्र :
हे असे कोणतेही क्षेत्र असते (पक्का किंवा कच्चा) ज्यावर थेट पाऊस पडतो आणि हे पाणी साठवण प्रणालीला पुरविले जाते.
खडबडीत जाळी :
ही जाळी, गाळनी म्हणून कार्य करते आणि पाने, काठ्या आणि इतर घाणीला प्रणालीत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.
‘कोंडुइट’ :
गोळा केलेले पावसाचे पाणी साठवण टाक्यात नेण्यासाठी वापरले जाणारे पाईप्स किंवा नाले.
प्रथम फ्लश :
हे उपकरण एका झडपासारखे आहे, जे साठवण टाकीपासून पावसाचे पहिले पाणी बाहेर व दूर टाकते. असे करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे पहिल्या पावसात सामान्यतः वातावरण आणि पाणलोट क्षेत्रातील सर्वाधिक प्रदूषक मिसळलेले असतात. फिल्टर्स: याचा उपयोग निलंबित केलेल्या प्रदूषकांना पाण्यापासून साफ करण्यासाठी केला जातो, फिल्टर्सचे अनेक प्रकार आहेत जसे – चारकोल वॉटर फिल्टर, सँड फिल्टर, होरिझॉनटल रफिंग फिल्टर आणि स्लो सँड फिल्टर.
साठवण टाक्या :
या टाक्या कोणत्याही आकाराच्या असू शकतात, जसे दंडगोलाकार, चौरस किंवा आयताकृती आणि प्रबलित सिमेंट कॉक्रिट (आरसीसी), चिनाई, फेरोसेमेंट इत्यादीपासून बनविल्या जाऊ शकतात.
रिचार्ज स्ट्रक्चर्स: डगवेल्स, बोअरवेल, रिचार्ज ट्रेनचेस आणि रिचार्ज खड्डे इत्यादीसारख्या योग्य संरचनेतून भूजल साठा / पातळी पुन्हा भरुन काढता येते.
रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमचे प्रकार:
मुख्यत्वे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमचे तीन प्रकार आहेत, ते म्हणजे थेट पंप करणे, अप्रत्यक्ष पंप करणे, केवळ गुरुत्वआणि अप्रत्यक्ष गुरुत्व प्रणाली आहेत.
थेट पंप करणे :
ही सर्वात सामान्य आणि व्यावसायिक प्रकारची रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम उपलब्ध आहे, आणि बहुतेक घरगुती वापरासाठी हे योग्य आहे. यामध्ये पंप भूमिगत टाकीमध्ये (सबमर्सिबल) किंवा बाह्य नियंत्रण युनिटमध्ये ( सक्शन) असतो आणि जेथे पाणी वापरायचे आहे तेथे थेट पंप केले जाते. जर टाकीत पाणी कमी असेल तर बाहेरून (मुख्य) पाणीपुरवठा) थोडेसे पाणी सोडले जाते जेणेकरून सतत आणि अखंड पाणीपुरवठा होईल.
अप्रत्यक्ष पंप करणे :
अप्रत्यक्ष पंप आणि डायरेक्ट पंप यांच्यातील साम्य बरेच आहे, फरक फक्त इतकाच आहे की हे गुरुत्वाकर्षणावर अवलंबून नाही आणि त्यामुळे टाकी कोठेही ठेवली जाऊ शकते. टाकीमध्ये पाण्याचा, दाबाणे पुरवठा करण्यासाठी बूस्टर पंप सेटचा वापर केला जातो.
अप्रत्यक्ष गुरुत्व :
या सेटअपमध्ये, रेन वॉटर हार्वेस्टिंग टँकमध्ये गोळा केलेले पाणी ओव्हरहेड टाकीमध्ये पंपच्या साहाय्याने टाकले जाते. पाईप, या ओव्हरहेड टाकीला जोडलेले असतात आणि तेथूनच घरांना पाणीपुरवठा केला जातो. जर पाणी संपत आले असेल तर, मुख्य पुरवठा होणारे पाणी थेट ओव्हरहेड टाकीमध्ये टाकले जाते, पावसाचे पाणी साठवण्याच्या टाकीत नाही.
केवळ गुरुत्व :
अत्यंत क्वचित प्रसंगी आपल्याकडे रेन वॉटर सिस्टम असू शकते जी पूर्णपणे गुरुत्वाकर्षणावर कार्य करते. हे तेव्हा होते जेव्हा कोणत्याही पंपची आवश्यकता नसते आणि गुरुत्वाकर्षण सर्व कामे करतो. हे करणे तसे कठिण आहे कारण साठवणीची टाकी ही संकलन टाकीच्या वर आणि घराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्याही वर असणे आवश्यक आहे. थोडक्यात, जेव्हा आपण पावसाचे पाणी जमिनीमध्ये हस्तगत करतो तेव्हा ते स्थानिक पाण्याचे रिचार्ज करण्यास मदत करते, शहरी पूर कमी करते आणि पाण्याचे दुर्भिक्ष झोनमध्ये पाणी पुरवण्यास मदत देखील करते.