स्टॉकहोम : साहित्य विश्वात एक मोठी बातमी समोर आली आहे. 2024 चा नोबेल साहित्य पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखक हान कांग यांना जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने त्यांच्या खोल काव्यात्मक गद्याचा गौरव केला आहे, ज्यामध्ये ऐतिहासिक आघात आणि मानवी जीवनाची नाजूकता समोर येते.

हान कांग कोण आहे?
हान कांग तिच्या प्रगल्भ लेखनासाठी आणि मानवी भावनांच्या खोलीचे चित्रण यासाठी ओळखली जाते. इतिहासातील वेदनादायी अनुभव त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये अतिशय संवेदनशील आणि काव्यमय पद्धतीने मांडले आहेत. “द व्हेजिटेरियन,” “व्हाईट बुक,” “ह्युमन ऍक्ट्स” आणि “ग्रीक धडे” ही त्यांची काही प्रमुख कामे आहेत.
यापूर्वी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिके जाहीर झाली आहेत. डेव्हिड बेकर, डेमिस हॅसाबिस आणि जॉन एम. जम्पर यांना रसायनशास्त्रातील प्रथिने रचना आणि संगणकीय प्रोटीन डिझाइनमधील योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला. भौतिकशास्त्रात जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना कृत्रिम न्यूरल नेटवर्कवरील संशोधनासाठी सन्मानित करण्यात आले.

नोबेल पुरस्काराबद्दल
७ ऑक्टोबरपासून नोबेल पारितोषिकांना सुरुवात झाली. येत्या काही दिवसांत 13 ऑक्टोबरला शांततेचा नोबेल तर 14 ऑक्टोबरला अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर होणार आहे. जगात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. नोबेल पारितोषिक विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे 1 दशलक्ष यूएस डॉलर) दिले जातात.