महादेव बेटिंग ॲप प्रकरणात भारताच्या तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. महादेव बेटिंग ॲपचा (Mahadev betting app) मालक सौरभ चंद्राकर याला इंटरपोलने दुबईतून ताब्यात घेतले असून, त्याला भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीची टीम महादेव ॲपचे मालक सौरभ चंद्राकरला आठवडाभरात भारतात आणू शकते.

इंटरपोलने नोडल एजन्सी असलेल्या सीबीआयला याची माहिती दिली असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ईडीने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. महादेव ॲपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर याचे डी कंपनीशी (दाऊद इब्राहिम) संबंध आहेत. महादेव ॲपवर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. याआधीही डिसेंबर २०२३ मध्ये सौरभ चंद्राकर यांना दुबईत नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले आहेत. महादेव ऑनलाइन सट्टेबाजी ॲप प्रकरण तेव्हा चर्चेत आले जेव्हा ईडीने ‘कॅश कुरिअर’चे ईमेल स्टेटमेंट रेकॉर्ड केल्याचा दावा केला ज्याने उघड केले की छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यूएई-आधारित ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे 508 कोटी रुपये घेतले होते घेतले होते. मात्र बघेल यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.