अत्तराचाही एक वेगळा इतिहास आहे. अत्तराच्या मनमोहक सुगंधाची गोष्ट भरपूर रंजक माहितीने भरलेली आहे. अत्तराच्या सुगंधाने माणूस मुग्ध होत असतो. आज सुगंध हा श्रीमंतांचा शौक तर झाला आहेच पण मध्यम व कनिष्ठ वर्गही याकडे खूपच आकर्षित आहे. अत्तराचा वापर वैदिक काळापासून
सुरू झाला होता. एखाद्या व्यक्तीच्या हाताला एखाद्या हरणाच्या नाभीतून स्रवणारा सुगंध लागला आणि तेव्हापासून माणसाने त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे दरवेळी अत्तर एक नवे रंगरूप घेत गेले. हत्तीच्या शरीराला एक प्रकारचा मदमस्त वास येत असतो. ज्याचा अभ्यास करून मानवाने अत्तराच्या विस्तारात अभूतपूर्व योगदान दिले. तसे उंदरात ‘मुस्क’ व गायीत ‘गोरोचन’ सारख्या गंधतत्त्वावरही अनेक चमत्कारिक प्रभाव सिद्ध केले गेले आहेत.
कस्तुरीचा सुगंध एवढा तीव्र असतो की, ती हुंगल्याने नाकही फाटते. याच सुगंधाने प्रभावित मानवाने अनेक प्रयोग प्रदर्शित केले. याचा वापर फक्त शौक म्हणून नव्हेतर अनेक पद्धतींनी अश्नय कामेही श्नय केली गेली आहेत. महतीने प्रभावित होऊन ‘गयदाज’ याच्या नावाच्या वैद्याने यावर एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात अत्तराच्या सुगंधावरून मित्र व शत्रूला ओळखण्याच्या कलेवर व्यापक प्रकाश टाकला गेला आहे. अत्तराच्या वासाद्वारेच रासायनिक घटकांच्या प्रयोगाचेही शोध लावले गेले आहेत. वैज्ञानिकांनी निरनिराळ्या वासांमध्ये रस दाखवला होता. सध्या तर याचे महत्त्व ओळखून या क्षेत्रात व्यापक प्रचारासाठी प्रत्येक सजीव जीव-जंतूंवर त्यापासून मिळणाऱ्या गंधांच्या प्राप्तीसाठी विविध प्रयोगात्मक काम केले आहे.
पदार्थांपासून मिळणाऱ्या गंधाला ‘मरा’ म्हणतात तर फुले वाटून मिळणाऱ्या वासाला ‘परिमल’ म्हणतात. जलचरांच्या शरीरापासून मिळणाऱ्या वासाला ‘अम्बर’ म्हणतात. सर्वश्रेष्ठ सुगंधाला ‘सुरभि’ म्हणतात. हे निर्विवाद सत्य आहे की, अत्तराचा शोध भारतात लागला. येथूनच परदेशांत याला मान्यता मिळाली. जेव्हा परदेशी भारतातून जातात त्यांना एक प्रकारचा ‘सुगंध’ मिळतो. ते मोहित होऊन येथील मातीतून ‘मंद’ सुगंध मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. अशाप्रकारे इराण, रूमानिया, अरब, इजिप्त, अफगाणिस्तान यासारख्या मोठ्या देशांतही अत्तराचा सुगंध भारतामुळेच दरवळू लागला आहे. युरोपियन देशांत खाडी देशांद्वारे याचा वापर सुरू झाला.
फ्रान्समध्ये मद्यउत्पादनात अत्तराचा वापर सुरू केला. आपल्या देशात मोगल बादशहांनी अत्तरांचा जास्त वापर केला आहे. शाहजहान, नूरजहाँ, औरंगजेब याशिवाय नवाब वाजिद अली शाहलाही याची खूप आवड होती. त्यांनी ‘इत्रे गुलाब’ नावाच्या नव्या अत्तराचा शोध लावला. आता भारतीय जनतेत तेच अत्तर प्रचलित आहे ज्यावर विदेशी मोहर असते. भले ते रद्दी प्रकारचे का असेना. फ्रान्समध्ये एक असे अत्तर काढले गेले ज्याला ‘ अल्कोहोल’ म्हणतात. याचा सुगंध क्षणभरच टिकतो. याला ‘सेंट’ ही म्हणतात. आज नवनवीन शोध चालू आहेत. आता तर अत्तर नाममात्रच राहिले आहे. क्षणभराच्या सुगंधाने अत्तर होत नाही. अत्तर असे असते जे माणसाच्या शरीरात सतत दरवळत राहते.