
अकोला (१ जुलै) सन १९६३ ला शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थीच्या स्नेह भेटीचा अमृत योग शासकीय बहुउद्देशीय मुलांच्या शाळेत जुळून आला. माजी विद्यार्थी विनायक पांडे, प्रभाकर जोशी, विजय वाखारकर, रमाकांत कुटासकर, मुकुंद दिगांबर, श्रीकांत सोमन, अनघा जोगळेकर यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती लहरिया होत्या. मुकुंद दिगांबर यांनी प्रास्ताविक केले सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपण काय कार्य करतो हे सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. विनायक पांडे माजी शाळा प्रमुख यांनी अविस्मरणीय प्रसंग कथन केले. नातू यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.
About The Author
Post Views: 86