अडलेल्या अन् नडलेल्या
कामांसाठी सलाम केले
तेच त्यांचे
सूर्यनमस्कार झाले.
कर्जापाई अल्पशा
धनकोसमोर वाकत गेले
तेच त्यांचे
वक्रासन झाले.
पोटाचे अन्न दात्याच्या
जेव्हा खपाट झाले
तेच त्यांचे
कपालभाती झाले.
यानेही धुडकावले
अन् त्याने ही धुडकावले
तेच त्यांचे
अनुलोम विलोम झाले.
वैतागून कर्जाला
तिरडीस जवळ केले
तेच त्यांचे
शवासन झाले.
नारायण अंधारे
शिर्ला (अंधारे)
7387277120
About The Author
Post Views: 100