वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
दरवर्षी जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी महिन्यामध्ये सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मुर्तीच्या पायावर पडतात तर फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात यालाच महालक्ष्मीचा किरणोत्सव असे म्हणतात हा किरणोत्सव खप मोठ्या उत्साहात पार पडला जातो. महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आहे देवीच्या मंदिराची मांडणीही चालुक्यांच्या काळात इ. स. ६०० ते ७०० मध्ये झाली आहे असा उल्लेख सापडतो. पुराणे अनेक जैन ग्रंथ व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातन सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. मूर्तीच्या जवळील सिंह यामुळे अंबाबाई जगदंबाचे रुप आहे असे वाटते.
देवीच्या डोक्यावर मुकुट आहे त्यावर नाग मुद्रा आहे अकराव्या शतकातील महालक्ष्मी अंबाबाई ही जागृत देवी आहे. या देवीला नवसाला पावणारी देवी म्हणत असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ अंबाबाईच्या दरबारी असतो.
बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाईने नवस फेडण्यासाठी जवळपास ५ किलो सोन्याचे चुडे वाहिली असा उल्लेख कागदपत्रांमध्ये आढळतो. शुक्रवार व मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती घोडे वगैरे सर्व लवाजमा होता. नवस प्राप्तीसाठी मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे.
महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कोंड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्तियपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्ता होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.
काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तरचालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसऱ्या संभाजीने त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी संभाजीने सिधोजी हिंदूराव घोरपडेला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.
हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरवाजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत.
पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका 0.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्या वर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्यातवर ठेवून तिची पूजा करतात.