वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
ग्रामीण भागातील जनजीवन शहरी भागापेक्षा फार वेगळे आहे. त्यामध्ये राहणीमान, जेवण पद्धती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतो. आता हिवाळा सुरू झाल्याने शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण आहे.
हिवाळा म्हटला की, प्रत्येक जण हिवाळ्यातील उबदार व पौष्टिक आहाराचे सेवन करीत असतो. त्यात काजू, बदाम आदींचे सेवन करतात. परंतु, ग्रामीण भागात एवढे महागडे किमतीचे खाद्य कमी लोक खातात. परंतु, हिवाळ्यात ग्रामीण भागातील शेतकरी हिवाळ्यात अथवा थंडीत ऊब तयार व्हावी यासाठी काही धान्याची निवड करतात. त्यामध्ये उडीद, बाजरी, ज्वारी इ. धान्य हिवाळ्यात ऊब मिळून देतात. परंतु, शेतकरीवर्गाला हिवाळ्यात ऊब देणारी कोणती भाकरी असेल तर ती म्हणजे चुलीवरची बाजरीची भाकर, बाजरीची भाकरी ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ग्रामीण भागातील बायका तीन दगडांची चूल अथवा मातीपासून तयार केलेली चूल यावर मोठा तवा ठेवून लाकडी परातीमध्ये बाजरीचे पीठ मिसळून गरमागरम बाजरीची भाकरी तयार केली जाते. विशेष म्हणजे चुलीवरच्या भाकरीवर जो पापुद्रा येतो तो खाण्याची मजा काही वेगळीच असते.
सध्या फक्त ग्रामीण भागातच चूल पाहायला मिळते. शहरी भागात मातीच्या चुलीची जागा गैसने घेतल्यामुळे शहरातील बायकांना चुलीवरची भाकरी बनविणे तर सोडा, पण त्या खाणेसुद्धा पसंत करीत नाही. खेड्यात बाजरीच्या भाकरीला हिवाळ्यात सुगीचे दिवस येतात. कारण थंडीत मोठ्या प्रमाणात ऊब बाजरीच्या भाकरीतून मिळत असल्याने बळीराजा या भाकरीला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतो. परंतु, आता मात्र शहरी भागातील नागरिकांना बाजरीची भाकरी खाण्यामागचे विज्ञान समजल्यामुळे आता शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या गरमागरम बाजरीच्या भाकरीचे आकर्षण वाटू लागले आहे. आता मात्र बळीराजाच्या शेतामध्ये बाजरीची पीक अत्यंत कमी घेताना दिसत आहे. त्यामुळे बाजरीला एका बाजूने सुगीचे दिवस येऊ पाहत असताना, दुसऱ्या बाजूला शेतातील बाजरीचे पीक अत्यंत कमी प्रमाणात येऊ लागल्याने भविष्यात बाजरी मिळणे कठीण होते की काय? असा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे.
शहरातील चुलीवरची बाजरीची भाकरी नामशेष होण्याच्या मार्गावर. हिवाळ्यात बाजरीची भाकरी ऊब देणारी म्हणून महत्त्वाची मानली जाते. शहरात मातीच्या चुलीची जागा गॅसने घेतल्याने बाजरीची भाकरी नामशेष.आता बाजरीच्या भाकरीचे महत्त्व कळल्यामुळे शहरी भागातील जनतेला बाजरीच्या भाकरीचे आकर्षण.