नवी दिल्ली, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरचे कौतुक केले असून, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकर म्हणाला, काश्मीरची बॅट हे ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’चे उत्तम उदाहरण आहे. देशभरातील आणि जगभरातील लोक
जम्मू-काश्मीरमध्ये या आणि तेथील सौंदर्याचा अनुभव घ्या. तेंडुलकरने आपल्या जम्मू-काश्मीर भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आणि या भेटीच्या आठवणी कायम आपल्या मनात राहतील, असे सांगितले. तेंडुलकरांच्या या पोस्टवर पंतप्रधानांनी उत्तर दिले की हे पाहणे अद्भूत आहे.
