वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
- भारतात पाच महिलांमध्ये एकीला संधीवाताचा त्रास तासनतास कम्प्युटरवर काम करणे, टीव्हीसमोर ठाण मांडून बसणे, चालण्याची दुरावलेली सवय, वाढलेले वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली यामुळे भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी अतिश्रमाची कामे करणाऱ्यांमध्ये हा आजार आढळून येत होता. पण बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्येही आता याचे प्रमाण वाढले आहे. भारतात पाच महिलांपैकी एकीलासंधिवाताचा त्रास असल्याचे आढळून आले आहे.
सांधेदुखी आणि त्यामधून उद्भणारे विकार याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं आणि त्याचवेळी शासनकर्ते आणि धोरणकर्त्यांना या रोगाविषयी सजग करून उपाययोजना करायला लावणं या हेतूने दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी जागतिक संधीवात दिन साजरा केला जातो. यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘ डोन्ट डिले, कनेक्ट टुडे ‘ ही संकल्पना निश्चित केली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सांधेदुखीची समस्या वाढत आहे. सध्या १५ टक्के महिलांमध्ये संधिवात आढळून येतो.
संधिवात दिवस. सन १९९६ सालापासून साजरा करण्यात येतो. शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला ‘आर्थरायटीस’ किंवा संधिवात म्हणतात. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची नाकारता येत नाही.
अनेकदा उपचार घेण्यासाठी लोक डॉक्टरांकडे जाण्यासाठी घाबरतात, टाळाटाळ करतात. शिबिराच्या माध्यमातन डॉक्टरांना रोग्यांकडे घेऊन जाण्याचा उत्तम पर्याय असल्याने नागरिकांसाठी मोफत अस्थीरोग निदान शिबिर आयोजित करण्यात येतात. शरीराच्या निकोप वाढीसाठी योग्य आहार, तसेच नियमित व्यायाम आणि चालणे गरजेचे असते. परंतु अज्ञान व अंधश्रध्दा यामुळे लोकांची हाडे ठिसूळ बनत चालली आहेत.
या सर्व महिला ४५ वर्षे वयोगटातील आहेत. महिलांमधील वाढता स्थूलपणा संधिवाताला कारणीभूत ठरत आहे. महिलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण ५४ टक्के असून त्यामुळे महिलांना संधिवाताची समस्या भेडसावत आहे. संधिवाताचे १००हून अधिक प्रकार आहेत; पण यामध्ये हाडांचा संधिवात अधिक आढळतो. झिज होऊन सांधे दुखणे-सुजणे याचे भारतात प्रमाण अधिक आढळते. गुडघ्यावर याचा आघात होतो. कारण गुडघा हा सर्वाधिक मार व भार सोसत असतो. गुडघ्याची हालचाल सर्वाधिक होत असते. धावणे, पळणे, उड्या मारणे, वजन उचलणे यामध्ये गुडघ्याची झिज होते. संधिवात सोरायटिक, ऑस्टिओ सोरायटिक, पॉलीमाल्जिया संधिवात, अंकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस, प्रतिक्रियाशील, संधिरोग हे संधिवाताचे प्रकार आहेत.संधिवात शरीराच्या कोणत्याही भागातून होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे सांध्यांमध्ये यूरिक अॅसिड जमा होणे आणि हळूहळू ते संधिवाताचे रूप घेऊ लागते. सांधेदुखीमुळे सांधे आणि हाडांमध्ये असह्य वेदना होतात.