नवी दिल्ली : जर तुम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता आणि रात्री ८ वाजता रात्रीचे जेवण केले तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी होऊ शकतो, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे. व्यस्त दैनंदिन दिनचर्या असलेल्या लोकांसाठी, डॉक्टर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्याचा मंत्र मानतात. एका अभ्यासाचा दाखला देत डॉक्टरांनी लवकर, नियमित आणि योग्य वेळी अन्न खाण्यावर भर दिला आहे. फ्रान्समधील सॉयन पॅरिस नॉर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज- २०२२ या अभ्यासात जेवणाची वेळ आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका (सीव्हीडी) यांच्यातील संबंध असल्याचे नमूद केले आहे.
भारतातील एक लाख लोकसंख्येमागे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूदर २७२ असून जागतिक २३५ सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. सीव्हीडी हा हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या विकारांचा एक समूह आहे आणि त्यात कोरोनरी हृदयरोग, सेरेब्रोव्हॅस्कुलर रोग, संधिवात, हृदयरोग आणि इतर परिस्थितींचा समावेश आहे. दिवसाचे पहिले आणि शेवटचे जेवण लवकर खाणे तसेच रात्री जास्त काळ उपवास केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो, असे फ्रेंच अभ्यासात दिसून आले आहे. जेवणाची वेळ हृदयविकार रोखण्यासाठी संभाव्य भूमिका अधोरेखित करते, असे संशोधकांचे मत आहे. कानपूर येथील रीजेंसी हॉस्पिटलचे सल्लागार हृदयरोगतज्ज्ञ अभिनीत गुप्ता म्हणाले की, देशातील हृदयविकाराचे वाढते प्रमाण पाहता या निष्कर्षांचा परिणाम लोकसंख्येवर होऊ शकतो. एक डॉक्टर म्हणून मी भारतातील लोकांना त्यांच्या जेवणाच्या वेळेची काळजी घेण्याचा आणि पौष्टिकतेबाबत संतुलित दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला देईन, वेगवेगळ्या लोकांच्या आहारातील गरजा भिन्न असू शकतात, तरीही नियमितता दोन जेवणांमधील वेळ मध्यांतर आणि झोपायच्या वेळेआधी जड जेवण टाळणे यावर जोर देणे महत्त्वाचे आहे. हा सल्ला संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाली आणि निरोगी हृदयासाठी योगदान देणारे इतर घटकांसह निरोगी जीवनशैली राखण्याच्या स्थापित तत्त्वांशी सुसंगत आहे, असे डॉ. गुप्ता म्हणाले. सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त, उपवासाच्या कालावधीसह अन्नसेवनाचे दैनिक चक्र (जेवण, नाश्ता इ.) शरीराच्या विविध अवयवांच्या सकॅर्डियन रिदम नियंत्रित करते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो. हृदय व रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो.