वृत्तसंस्था
मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानाद्वारे कोरोना लस संशोधनात मोलाची कामगिरी बजावून जगाला मृत्यूच्या कराल दाढेतून बाहेर काढण्यात योगदान दिलेले शास्त्रज्ञ कॅटलिन कारिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. १ दशलक्ष डॉलर्सच्या रोख रकमेसह स्मृतिचिन्ह देऊन उभयतांना १० रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. ज्यावेळी कोविड- १९ ने जगाला विळखा घातला होता, त्यावेळी मानवाच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. त्यावेळी या दोन शास्त्रज्ञांनी मेसेंजर आरएनए अर्थात एमआरएनए या तंत्रज्ञानाद्वारे कोविड- १९ प्रतिबंधक लस शोधून काढण्याची कामगिरी बजावल्यामुळे त्यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा निवड मंडळाने केली आहे. वैद्यकशास्त्रात अनेक दशकांपासून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल दिला जात होता. यावेळी प्रथमच ही पद्धत मोडून नवसंशोधनासाठी या दोघांना सन्मानित केले आहे.
या पारंपरिक लसींपेक्षा आरएनए लस अधिक प्रभावशाली आहे. ‘ लसीमुळे थेट जनुकीय रेणुद्वारे प्रतिकारशक्ती मजबूत होऊन विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यास मज्जाव केला होता.
२०२१ साली लास्कर पुरस्कार
कारिको (हंगेरी) आणि वेसमन (अमेरिका) हे दोन्ही शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून एकत्रपणे संशोधन करीत आहेत. पेन्सिलव्हिया विद्यापीठात त्यांनी सहकारी म्हणून काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०२१ साली त्यांना लास्कर पुरस्कार मिळाला होता.
कर्करोग, शिंका, हृदयरोगासह विविध आजारांसाठी उपयोगी
जीवघेण्या विषाणूंचा मुकाबला करणाऱ्या लसीवर संशोधन करण्याची कल्पना त्यांना सर्वप्रथम १९९० च्या दशकात सुचली होती. प्राण्यांच्या मार्फत रोगराई पसरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी २००५ नंतर त्यांनी घातक विषाणू प्रतिबंधक लस शोधून काढणारे एमआरएनए तंत्रज्ञान विकसित केले होते. या तंत्रज्ञानाद्वारे कर्करोग, एनफ्लूएंजा, हृदयरोग, झिका, रेबिज आदी विविध आजार आणि रोगावर उपचार करण्यास एमआरएनएचा वापर करण्यात येत आहे.
कारिको या वैद्यकशास्त्रातील नोबेल मिळवणाऱ्या १३ व्या महिला
कारिको (वय ६८) या हंगेरीतील विद्यापाठात प्राध्यापक असून पेन्सिलव्हिया विद्यापीठात त्या सहयोगी प्राध्यापक आहेत. बायोएनटेकच्या त्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. बायोएनटेकची पीफिझरमध्ये भागीदारी आहे. पीफिझरने कोव्हिड – १९ प्रतिबंधक लस शोधून काढली आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेल मिळणाऱ्या त्या १३ व्या महिला शास्त्रज्ञ आहेत. नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची सर्वात आधी बातमी माझ्या पतीने दिली. या पुरस्कारामुळे खूप आनंद झाला आहे. एमआरएनए लसीमुळे कोरोनावर मात करता आल्याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वेसमन (वय ६४) हे पेन इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत. या संस्थेमध्ये आरएनएवर संशोधन केले जाते. कारिकासोबत ते १९९० पासून काम करीत आहेत. दरम्यान, एसवंते पाबो या स्विडिश शास्त्रज्ञांना गेल्यावर्षी डीएनएवरील संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचा नोबेल गेल्यावर्षी जाहीर करण्यात आला होता. नोबेल पारितोषिक १९०१ मध्ये सुरू झाल्यापासून २०२२ पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील २२५ लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
एमआरएनए तंत्रज्ञान म्हणजे काय?
• एमआरएनए हा अनुवांशिक कोडचा एक छोटासा भाग आहे, जो आपल्या पेशींमध्ये प्रथिने बनवतो. जेव्हा एखादा विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरावर हल्ला करतो तेव्हा एमआरएनए तंत्रज्ञान आपल्या पेशींना त्या विषाणू किंवा जीवाणूंशी लढण्यासाठी प्रथिने तयार करण्याचा संदेश पाठवते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला आवश्यक असलेली प्रथिने मिळतात आणि आपल्या शरीरात प्रतिपिंड तयार होतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही लस पारंपरिक लसीपेक्षा लवकर बनवू शकते. यासोबतच शरी- राची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. जगात पहिल्यांदाच एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित लस बनवली जात आहे.