रूप आणि तारुण्य या दोन्हीही गोष्टींनी संपन्न असून उच्च कुळांत जन्म असूनही जर मनुष्य विद्याविहीन असेल तर तो शोभून दिसत नाही. ज्याप्रमाणे सुगंध नसलेले चाफ्याचे फूल असते त्याचप्रमाणे हा असा मनुष्य असतो.
ही अशी स्थिती आजकालही दिसून येते. निसर्गात तयार होणारी सोनचाफ्याची फुले कितीही सुंदर आणि सुगंधी असली तरी आजकाल सामान्य माणसाचा ओढा प्लॅस्टिकच्या चाफ्यासारख्याच दिसणाऱ्या परंतु सुगंध नसलेल्या फुलांकडे असतो. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीकडे किंवा पुरुषाकडे पाहाताना त्याच्या विद्येकडे न पहाता त्याच्या रूपाकडे, तारुण्याकडे आणि त्याच्या संपत्तीकडे सामान्य माणसे आकर्षित होतात. ह्या वरुन असे लक्षात येते की, सामान्य मनुष्याने समाजाकडे कसे पहावे ही गोष्ट समजतच नाही.
About The Author
Post Views: 79