वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नेरूळ (मुंबई) कार्यकर्ते व्हा पद आज आहे उद्या नाही म्हणून पदाधिकाऱ्यांनी निरंतर कार्यरत राहून कार्यकर्ते व्हावे असे उद्गार महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्कॉम) अध्यक्ष अरुण रोडे यांनी नेरुळ( मुंबई )येथे जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय समितीच्या अध्यक्ष व सचिवांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना काढले . सत्राच्या प्रारंभी प्रशिक्षणार्थींना संदर्भ ग्रंथांचा संच विनामूल्य पुरविण्यात आला.साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकची धर्म ‘या प्रार्थनेनंतर ज्येष्ठ नागरिक भुवन मुंबईचे अध्यक्ष ना.ना. इंगळे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी आपल्या मनोगतात प्रसंगी. ‘दगडालाही घडवू ‘परंतु काम करू असे सांगितले तर उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठांनी प्रथम आपले आरोग्य सांभाळण्याचे आवाहन केले. तर अँड प्रमोद ढोकळे यांनी ज्येष्ठांशी संबंधित नियम अधिनियम आणि कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष अंजुमन खान यांनी जिल्हा अध्यक्ष यांचा समन्वय असावा असे सांगितले .शिव व्याख्याते रवींद्र पाटील यांनी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्याने त्यांनी आपल्या मनोगतात आज पुस्तकांचे पूजन होत आहे वाचन होत नाही अशी खंत व्यक्त केली. चंद्रकांत महामुनी यांनी फेस्कॉम डिजिटल अँकेडमी बाबत मार्गदर्शन केले. विविध विषयांवर गटचर्चा झाली गटचर्चेत न आलेल्या बाबींवर अध्यक्ष अरुण रोडे यांनी मार्गदर्शन केले. निष्क्रिय संघ सक्रिय करणे आणि गाव तिथे संघ स्थापन करणे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. फेस्कॉमचे मुख्य सचिव विवेक देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. द्विदिवसीय कार्यशाळेची पसायदानाने सांगता झाली.