वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
दिवाळी झाल्यावर वेध लागतात ते तुळशी विवाहाचे. तुळशी विवाहाला ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. यानंतर लग्नसराईची धामधूम सुरू होणार आहे. यंदा २६ नोव्हेंबरपासून मार्चअखेर तब्बल ३१ मुहर्त आहेत. कोरोनानंतरच्या यावर्षीचा लग्नाचा सिझन धुमधडाक्यात साजरा होणार आहे.
कार्तिक पौर्णिमेला समृद्धी, संपन्नतेचा सोहळा असलेला दीपावलीचा समारोप होणार आहे. ५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी आहे. याच दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत अर्थात ८ नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह साजरा करण्यात येणार आहे. ५ नोव्हेंबरलाच चातुर्मास समाप्ती, शनिप्रदोष शाकव्रत समाप्ती असल्याने या दिवसांपासून विवाह सोहळे, मौजी बंधनाचे सनईचौघडे वाजण्यास प्रारंभ होणार आहे.
पावसाळा आटोपल्यानंतर सोयीनुसार विवाह सोहळे साजरे करण्यात येतात. त्यानुसार वेदिक परंपरेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीपासून (देवशयनी) ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत (देवउठनी) चातुर्मास पाळला जातो. यंदा देवउठनी एकादशी ४ नोव्हेंबरला आली आहे. द्वादशीला श्रीकृष्ण यांच्याशी तुळशीचा विवाह लावण्यात येतो आणि तेव्हापासून वैवाहिक मुहूर्त काढले जाण्याची परंपरा असून, ती टिकून आहे.
यावर्षी नोव्हेंबर ते मार्चदरम्यान ३१, मे ते जूनदरम्यान २६ मुहूर्त आहेत. गतवर्षीपेक्षा फेब्रुवारी, मे व जून या तीन महिन्यांत सर्वाधिक मुहूर्त आहेत. दरम्यान, गेल्या दोन वर्षात लग्नसराईत बाजारपेठेतमंदीहोती.आतागणेशोत्सव व दसरा-दिवाळीत ही मंदी काहीशी धुऊन निघाली.आता लग्नसराईत पुन्हा तेजीचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना या सिझनमध्ये मंडप, डेकोरेशन, कपडे, सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक्स खरेदी, मंगल कार्यालयांतून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा असते. यावर्षी ही कमी भरून निघेल.
शास्त्राप्रमाणे यंदा ५८ मुहूर्त
चातुर्मास समाप्ती ते चातुर्मास प्रारंभापर्यंत अर्थात २५ नोव्हेंबर २०२२ ते २८ जून २०२३ या काळात शास्त्रानुसार ५८ विवाह मुहर्त येत आहेत. एप्रिल २०२३ मध्ये गुरूचा अस्त असल्यामुळे फक्त रविवार ३० एप्रिल रोजी विवाह मुहर्त आहे.२०२३ मध्ये २९ जूनपासून चातुर्मास सुरू होत आहे.
महिना आणि विवाहाच्या तारखा
नोव्हेंबर : २५, २६, २८, २९
डिसेंबर :२,४,८,९,१४,१६,
१७,१८,१९ जानेवारी : १८,२६, २७, ३१
फेब्रुवारी : ६,७,१०,११,१४,१६, २३,२४,२७,२८
मार्च : ९,१३,१७,१८
एप्रिल : ३०
मे : २,३,४,७,९,१०,११, १२,१५,१६, २१, २२, २९,३०
जून : १,४,७,८,११,१२,१३, १४,२३,२६,२७,२८